AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Amavasya 2024 : या तारखेला आहे मौनी अमावस्या, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व

अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.

Mouni Amavasya 2024 : या तारखेला आहे मौनी अमावस्या, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व
मौनी अमावस्या Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 7:32 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अनेक तिथी आहेत आणि सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे अमावस्या. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी (Mouni Amavasya) अमावस्या म्हणतात. जैन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. हिंदूंमध्ये ही दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार, 2024 मध्ये मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8.02 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या पाळली जाणार आहे.

मौनी अमावस्येचे महत्व

मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी जमतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करता येत नाही ते घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्यानेही हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

मौनव्रत पाळावे का?

अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.

दान करणे चांगले आहे का?

मौनी अमावस्येच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने देवता आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. या दिवशी तीळ तांदूळ तिळाचे लाडू कपडे तीळाचे तेल पैसे दान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?