शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन; या राशींच्या आयुष्यात येणार मोठं वादळं, पाच महिने सावधान
शनि देवांना न्यायाची देवता असं म्हटलं जातं, ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणून त्यांना कर्मफळदाता देखील म्हटलं जातं.

शनि देवांना न्यायाची देवता असं म्हटलं जातं, ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणून त्यांना कर्मफळदाता देखील म्हटलं जातं. आजपासून बरोबर आठ दिवसांनी शनिदेव आपलं नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. शनि देव यांची चाल ही अत्यंत धिमी असते. शनि देव आता उत्तरभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ज्योतिशस्त्रानुसार जेव्हापण शनि देव आपली रास किंवा नक्षत्र बदलतात तेव्हा त्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होतो. तर काही राशींना याचा मोठा फटका बसतो.
शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन
शनि देव आणखी आठ दिवसांनी म्हणजेच 28 एप्रिलला नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. शनि देव 28 एप्रिलला उत्तरभाद्रपदा नक्षात प्रवेश करणार आहेत. याचा काही राशींवर शुभ परिणाम होणार आहे. मात्र तीन अशा राशी आहेत, ज्यांना या नक्षत्र परिवर्तनाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
कोणत्या आहेत त्या राशी?
मेष – शनिदेव 28 एप्रिल रोजी उत्तरभाद्रपता नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. याचा मेष राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे या लोकांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. शनि देवांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशींच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात. अकस्मात संकटं येऊ शकतात. एखाद्या सरकारी कार्यात विलंबाची शक्यता आहे, तसेच खर्चामध्ये देखील वाढ होऊ शकते. वाहन चालवताना मेष राशींच्या लोकांनी काळजी घ्यावी, तसेच रागावर देखील नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
मिथुन – मिथुन राशीला देखील या नक्षत्र परिवर्तनाचा मोठा फटका बसू शकतो. अनावश्यक खर्चात मोठी वाढ होऊ शकते. घरात वाद वाढू शकतात. महत्त्वाच्या कामांमध्ये विलंबाची शक्यता आहे.
कुंभ – ज्यांची रास कुंभ आहे, अशा लोकांनी आपल्या करिअरसंदर्भात सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)