AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

numerology Today : मुलांक 7 आणि 9 च्या जातकांना रागावर ताबा ठेवणे आवश्यक, असे आहे तुमचे अंक जोतिष्य राशी फळ

अंकशास्त्रामध्ये (numerology Today) गणितीय संख्यांचा वापर करून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलूंचे आकलन करून भविष्य वर्तवले जाते. अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे, त्याचा मूलांक काढला जातो आणि नंतर त्या मूलांकाच्या आधारे, भविष्यवाणी केली जाते.

numerology Today :  मुलांक 7 आणि 9 च्या जातकांना रागावर ताबा ठेवणे आवश्यक, असे आहे तुमचे अंक जोतिष्य राशी फळ
अंकशास्त्रImage Credit source: Social MEdia
| Updated on: Jul 15, 2023 | 11:24 AM
Share

मुंबई : अंकशास्त्र हे वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राचे शास्त्र आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये (numerology Today) गणितीय संख्यांचा वापर करून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलूंचे आकलन करून भविष्य वर्तवले जाते. अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे, त्याचा मूलांक काढला जातो आणि नंतर त्या मूलांकाच्या आधारे, भविष्यवाणी केली जाते. शनिवार, 15 जुलै, 7 आणि 9 क्रमांकाच्या लोकांसाठी प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करावा. या मूलांकातील जातकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अंकशास्त्राचे अंदाज जाणून घेऊया.

मूलांक 1 : नशीब तुमच्या सोबत असेल

मूलांक 1 च्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे आणि नशीब तुमच्या सोबत राहील. आज तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि या पैशाच्या प्राप्तीमुळे तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. आज तुमच्या बोलण्यात खूप नम्रता असेल आणि तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आई-वडिलांचा आदर करा.

मूलांक 2 : तुमचे मनोबल उंचावेल

मुलांक 2 च्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांनी भरलेला असेल. आज तुम्ही खुप भावूक व्हाल. आज तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण प्रेम मिळेल. तुमच्या आईच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. कोणत्याही गुंतवणुकीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम असेल. दररोज भगवान शंकराला जल अर्पण करा. तुमचे मनोबल वाढेल.

मुलांक 3 : कोणत्याही व्यवहारात प्रवेश करणे टाळा

3 क्रमांकाच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबासमवेत धार्मिक प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. आज कोणाशीही व्यवहार करणे टाळा. तुमची माहितीपूर्ण चर्चा सर्वांना आवडेल. तुमचा सल्ला लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.  मुलांची विशेष काळजी घ्या. श्री विष्णु हरी आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा आज लाभदायक ठरेल.

मूलांक 4 : आर्थिक समस्यांमध्ये अडकू शकता

मूलांक 4 च्या जातकांसाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही आणि तुम्हाला विनाकारण अडचणीत अडकावे लागू शकते. आज कोणतेही काम कराल तर ते नीट चाचपणी करून करा. आज तुम्ही विनाकारण आर्थिक अडचणीत अडकू शकता. तुमच्या आईचे आरोग्य देखील तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकते. तुम्हालाही काही शारीरिक समस्यांची लक्षणे दिसत असतील तर त्यांची चाचणी घेणे अनिवार्य आहे. तुमची बुद्धिमत्ता सामान्यपेक्षा कमी काम करेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जास्त काही करू शकणार नाही. आज सावध राहा कोणी तुमची बदनामी करू शकते.

मूलांक 5 : यश मिळेल

अंक 5 असलेल्यांना फायदा होईल आणि आज तुमचा दिवस सामान्यपेक्षा चांगला जाईल. आज तुमची बुद्धिमत्ता तीक्ष्ण काम करेल आणि तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. पैसा मिळवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काही चांगल्या मार्गांचा विचार करू शकता. आज तुम्हाला तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असेल. तुम्ही तुमच्या कामात काही नवीन कल्पना देखील जोडू शकता.

मूलांक 6 : तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या

6 क्रमांकाच्या लोकांचे नशीब साथ देणार आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीशी आपुलकीने वागावे. आज तुम्ही तुमच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्यावी, अन्यथा तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. आज एखाद्या स्त्रीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला काही नवीन काम करायचे असेल तर आजपासून सुरुवात केल्यास तुम्हाला फायदा होईल.

मूलांक 7 : कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका

सातव्या क्रमांकाच्या लोकांचा दिवस शुभ नाही आणि तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही प्रकारच्या आर्थिक समस्येमुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. आज तुमच्या पत्नीचे बोलणे तुमचे मन दुखवू शकते. यामुळे तुम्हाला थोडे असहाय्य वाटेल. आज तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

मूलांक  8 : मानसिक तणाव जाणवेल

8 क्रमांकाच्या लोकांना आज काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करताना निराशेचा सामना करावा लागेल. भौतिक आणि आर्थिक सुखांमध्ये अडचण जाणवेल. आज तुम्हाला काही कारणाने मानसिक तणाव जाणवेल. तुम्ही काही विनाकारण अडचणीत अडकू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामातील सर्व उणिवा शोधून काढाल्या जातील, ज्यामुळे तुमच्यासमोर समस्या निर्माण होतील.

मूलांक 9 : रागावर नियंत्रण ठेवा

9 व्या राशीच्या लोकांचा दिवस सामान्य असेल आणि आज तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आज तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आज पैशाची हाताळणी सामान्यपेक्षा खूप चांगली होईल. आज कुटुंबात मालमत्तेचा वाद होऊ शकतो.  कोणतेही काम घाईने करू नका. अन्यथा पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.