AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2022: Pitru Paksha: पितृ पक्षात जन्मणाऱ्या मुलांचे कसे असते भविष्य? जोतिषशास्त्र काय सांगते?

अनेकांना असा प्रश्न पडतो की या दिवसांमध्ये जन्मलेल्या बाळाचे (Born) भविष्य काय असेल?  त्या मुलाचा स्वभाव कसा असेल? जाणून घेऊया

Pitru Paksha 2022:  Pitru Paksha: पितृ पक्षात जन्मणाऱ्या मुलांचे कसे असते भविष्य? जोतिषशास्त्र काय सांगते?
नवजात बालक Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 18, 2022 | 8:44 PM
Share

हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्ष (Pitru Paksha) हा  भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान पितरांच्या शांतीसाठी  श्राद्ध (Shradha and Pindadan) आणि पिंडदान केले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. पितृ पक्षाच्या काळात लग्न, मुंडन, ग्रहप्रवेश इत्यादी कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही. अनेकांना असा प्रश्न पडतो की या दिवसांमध्ये जन्मलेल्या बाळाचे (Born) भविष्य काय असेल?  त्या मुलाचा स्वभाव कसा असेल? जाणून घेऊया जोतिषशास्त्रात याबद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे.

पितृपक्षात जन्मलेली मुले भाग्यवान असतात

ज्योतिषांच्या मते पितृ पक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी या काळात जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात. पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांना पितरांचा आशीर्वाद असतो. असे मानले जाते की, अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात. ही मुले कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात. अशी मुले घरातील सदस्यांना नेहमीच महत्त्व देतात.

कसा असतो स्वभाव?

शास्त्रानुसार पितृ पक्षात जन्मलेली मुले खूप सृजनशील असतात. अशा मुलांचा जन्म एका खास उद्देशासाठी होतो. अशी मुले अतिशय आनंदी स्वभावाची असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल खूप आपुलकी असते.

सकारात्मक विचार करण्यासोबतच ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. ही मुले अगदी लहान वयातच मोठे यश मिळवतात. तथापि, पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत स्थितीत असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात.  ज्योतिषीय उपायांनी चंद्र मजबूत केला जाऊ शकतो.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन