
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 6th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
या काळात लोक तुमचे उत्तम विचार ऐकण्यास उत्सुक असतील. तुम्ही त्यांना तुमच्या मनाप्रमाणे काहीही पटवून देऊ शकता. अधिकार गाजवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा; त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
आज तुम्ही कला क्षेत्रात प्रसिद्ध व्हाल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धी आणि समजुतीनुसार काही निर्णय घ्याल, जे तुमच्या आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरतील.
आज तुम्हाला नोकरीबाबत चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आवडत्या कंपनीत तुम्हाला मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. या राशीत जन्मलेल्या नवोदित लेखकांसाठी हा दिवस शुभ असेल. तुमच्या पुस्तक प्रकाशनाचा मार्ग होणार मोकळा.
आज तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मुलांसोबत जास्त वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन करू शकता. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यायी योग्य गुंतवणूक कराल.
एखाद्या महत्त्वाच्या कामाच्या पूर्ततेबद्दल अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी सतत सुरू राहील. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला त्यांच्या घरी भेट देऊ शकता, जो तुमच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यास मदत करू शकेल.
अंगारकी संकष्टीला होईल गणेशाची कृपा. गेल्या अनेक दिवसांपासून जे काम अडकलयं, भावाच्या मदतीने पूर्ण होईल. आज फुकटचे सल्ला देणे टाळा. इतरांशी बोलताना तुमच्या भाषेची काळजी घ्या आणि अनावश्यक वाद टाळा.
आज जर तुम्ही शांत मनाने नवीन काम हाती घेतले तर ते नक्कीच यशस्वी होईल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. विवाहोच्छुक लोकांना अंगारकीच्या दिवशी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्या आज साध्य होणार आहेत, यश मिळेल. तुम्ही व्यर्थ मानलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील. आज घरात उत्सवाचे वातावरण असेल.
आज तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर येऊ शकतात, पण तुम्ही तुमची कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडाल. या राशीखाली जन्मलेल्या कंत्राटदारांचा आजचा दिवस चांगला जाईल.
ऑफिसच्या कामासंबंधित बाहेर जावं लागू शकतं. हाँ प्रवास फलदायी ठरेल. तुमच्या सहलीदरम्यान तुम्हाला एखाद्या दूरच्या नातेवाईकाची भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
आज तुमचा कल अध्यात्माकडे असेल. तुम्ही मंदिरात जाण्याचा किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा विचार करू शकता. आज चांगले परिणाम मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या वागण्यात काही बदल करावे लागतील.
उगाच चिडचिड तरू नका, घाईने निर्णय घेणं टाळा.
तुम्ही ऑफीसमध्ये चांगली कामगिरी कराल. तुम्हाला एखाद्या व्यवसायात सामील होण्याचे आमंत्रण देखील मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत किंवा भावंडांसोबत वेळ घालवाल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)