SL vs PAK 2nd T20I : श्रीलंकेसमोर कमबॅक करण्याचं आव्हान, पाकिस्तानचा हिशोब करणार?
Sri Lanka vs Pakistan 2nd T20i Live Streaming : यजमान श्रीलंका क्रिकेट संघाला टी 20i मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे श्रीलंका दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जाणून घ्या या सामन्याबाबत.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी 20I मालिका (Sri Lanka vs Pakistan T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. श्रीलंका टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सहयजमान आहे. तसेच पाकिस्तानचे (Pakistan) वर्ल्ड कप स्पर्धेतील (Icc T20i World Cup 2026) सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. पाकिस्तानने या मालिकेत विजयाने सुरुवात केली. पाकिस्तानने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता श्रीलंकेला पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सामन्यासह मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना कधी?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना शुक्रवारी 9 जानेवारीला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.
पाकिस्तानची विजयी सलामी
दरम्यान पाकिस्तानने या मालिकेत विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करताना हा सामना जिंकला. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 129 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 20 बॉलआधी पूर्ण केलं. आता सलमान आघा याच्या नेतृत्वात पाकिस्तान सलग दुसरा विजय मिळवणार की श्रीलंका दासुन शनाकाच्या नेतृत्वात कमबॅक करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
