AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविड… त्सुनामी आणि भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली… पुन्हा महाप्रलयाचं भाकीत… एकच दिवस उरला, या देशात काय घडणार?

बाबा वांगा यांनी अलिकडेच एक भयानक भाकीत केले आहे, ज्यामुळे जपानचे मन भीतीने ग्रस्त आहे. येता 5 जुलै 2025 हा दिवस जपानच्या लोकांसाठी खूप भयावह असणार आहे,असं भविष्य बाबा वांगा यांनी वर्तवलं आहे. त्याला अवघा 1 दिवस उरला आहे.

कोविड... त्सुनामी आणि भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली... पुन्हा महाप्रलयाचं भाकीत... एकच दिवस उरला, या देशात काय घडणार?
पुन्हा महाप्रलयाचं भाकीत... एकच दिवस उरला, या देशात काय घडणार? Image Credit source: social media
| Updated on: Jul 03, 2025 | 1:05 PM
Share

Japanese Baba Vanga Chilling Prediction For July 2025 : जपानमधील एक रहस्यमय मंगा कलाकार, रयो तात्सुकी (Ryo Tatsuki) (ज्याला सोशल मीडियावर ‘नवीन बाबा वांगा’ नावाने आळखले जात आहे) त्याने केलेल्या एका मोठ्या भाकितामुळे खळबळ माजली आहे. येत्या 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये मोठा त्सुनामी किंवा भूकंप येऊ शकतो, असं भाकित त्याने वर्तवलं आहे. त्यांच्या ‘द फ्युचर आय सॉ’ या मालिकेतील या दाव्यामुळे जगभरात, विशेषतः ट्रॅव्हल इंडस्टीमध्ये तर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भाकिताला अवघा एक दिवस उरला असून तेव्हा खरंच काय घडलाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

2011 च्या दुर्घटनेची आधीच केली होती भविष्यवाणी केली आहे (Japan Tsunami 2025 Prediction)

रयो तात्सुकी यांचं हे भाकित खूप गांभीर्याने घेतलं जात आहे. कारण त्यांनी 2011 साली झालेल्या विनाशकारी तोहोकू भूकंप आणि त्सुनामीची भविष्यवाणी केली होती. त्या दुर्घटनेत 18 हजारांहू अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.एवढंच नव्हे तर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातही एक भयानक दुर्घटना घडली होती.

जुलैमध्ये जपानमधील बुकिंगमध्ये मोठी घट (Ryo Tatsuki Prophecy)

Bloomberg Intelligence च्या रिपोर्टनुसार, रयो यांच्या भविष्यवाणीमुळे, भाकीतामुळे जुलैमध्ये जपानसाठी फ्लाइट बुकिंगमध्ये 83 % घट झाली आहे. हाँगकाँगहून येणाऱ्या पर्यटकांमध्ये 50% पर्यंत घट दिसून आली. अनेक प्रवाशांनी एप्रिल-मेच्या सुट्ट्यांसाठी केलेले बुकिंग देखील रद्द केले आहे.

जपान सरकारचे आवाहन काय ? (Japan Travel Cancellations)

याच पार्श्वभूमीवर जपान सरकारकडून महत्वाचे आवाहन करण्यात आलं आहे. या अफवा पूर्णपणे निराधार आहेत, असे मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई म्हणाले. वैज्ञानिकदृष्ट्या, अशा प्रकारे भूकंप किंवा त्सुनामीचा अंदाज लावता येत नाही. लोकांनी जपानला प्रवास करताना गोंधळून जाऊ नये आणि घाबरू नये,असेही त्यांनी सांगितलं.

तात्सुकीने स्वतःही दिला होता एक इशारा

रंजक गोष्ट म्हणजे खुद्द रयो तात्सुकी यानेही एक इशारा दिला होता. लोकांनी त्यांच्या ( तात्सुकी यांनी केलेल्या) भाकितांवर अंधविश्वास ठेवू नये आणि शास्त्रज्ञ काय सांगतात, ते ऐकुन त्यांच्या मताला प्राधान्य द्यावे, असेही तात्सुकी यांनी सांगितलं होतं.

तात्सुकीची चर्चित भाकितं -(Ryo Tatsuki 2025)

1995 साली झालेला कोबे भूकंप.

2011 सालचा टोहोकु भूकंप आणि त्सुनामी.

२०२० मध्ये साथीच्या आजाराचे लक्षण (कोविड-19 शी जोडलं गेलं).

फ्रेडी मर्क्युरी यांचे निधन.

‘रिंग ऑफ फायर’ (‘Ring of Fire’ ) वर असल्याने जपानला नैसर्गिक आपत्तींचा धोका आहे, परंतु भूकंपांचा अचूक अंदाज अद्याप शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तरीही तात्सुकीच्या भाकितामुळे जगभरातील लोकांमध्ये भीती आणि उत्सुकता निर्माण होत आहे. 5 जुलै उजाडायला आता अवघे काहीच तास बाकी असून त्या दिवशी नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.