
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला कर्माचा दाता म्हंटलं जातं. हा ग्रह कर्मानुसार व्यक्तीला फळ प्रदान करतो. शनिचा संबंध अनुशासन, व्यावहारिकता, संरचना, कायदा आणि सामाजिक न्यायाशी जोडलेला आहे.
त्यामुळे शनिच्या स्थितीमध्ये होणारे साधारण बदल देखील 12 राशींच्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. यंदा जवळपास ३० वर्षानंतर शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर २०२७ पर्यंत याच राशीमध्ये शनिदेव विराजमान राहतील. या दरम्यान जेव्हा ते वक्री होणार तेव्हा उलट चाल चालणार. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.
जुलै महिन्यात १३ तारखेला सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी शनि मीन राशीमध्ये जातील आणि उलटी चाल सुरू करतील. या परिवर्तनाचा थेट सकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार या वेळी काही राशींना सतर्क राहण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला अशा तीन राशी सांगणार आहे, ज्यांना या काळात लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात या राशीच्या लोकांची प्रगती होणार आहे. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत. ज्यांना या दरम्यान लाभ मिळू शकतो.
कन्या राशी
कन्या राशीच्या सातव्या भावात शनि वक्री होणार आहे. याचा परिणाम कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेन. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. प्रेम जीवनात सुख समृद्धी नांदेल. काही लोक विवाहाचा निर्णय घेऊ शकतात. शिक्षण आणि रिअल इस्टेट क्षेत्रात लाभ शक्य आहे. नवीन वाहन किंवा घर खेदी करण्याचे योग जुळून येत आहे. शिस्त आणि धैर्याने प्रत्येक कार्यात यश मिळू शकते.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री चाल शुभ संकेत देणारी ठरू शकते. हळू हळू या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. मकर राशीच्या तिसऱ्या भावात वक्री करणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. साडेसातीपासून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल. संवाद, नेटवर्किंग आणि धाडसीपणा वाढेल. या लोकांची वाणी अधिक प्रभावशाली होईल. ज्यामुळे अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. लहान भाऊ बहिणींना आणि जवळच्या मित्रांना सहकार्य मिळू शकते. यात्रांपासून लाभ मिळू शकतात. शनिच्या दृष्टीने आता नात्यात अडचणी कमी होऊ शकतात.
मीन राशी
शनिची वक्री स्थिती मीन राशीच्या लोकांसाठी विशेष फळदायक ठरू शकते. कारण शनि या राशीच्या लग्नभावात वक्री करणार. आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि ऊर्जेचा अनुभव होऊ शकतो. आत्मचिंतन आणि आत्मविश्वास वाढेल. सामाजिक जीवनात सक्रियता आणि प्रभाव दिसून येईल. विदेशात नोकरी व व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. जोडीदाराबरोबरचे संबंधामध्ये आणखी गोडवा दिसून येईल. करिअरमध्ये पुढे जाण्याचे योग जुळून येईल. संयम आणि धैर्याने केलेल्या कामात यश मिळू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)