AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan 2023 : श्रावण महिण्यात राशीनुसार करा महादेवाची पुजा, जलद प्राप्त होईल महादेवाचा आशीर्वाद

महादेवाला श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे. या दिवसात केलेली उपासना शिघ्र फलदायी असते. राशीनुसार महादेवाची पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात.

Shrawan 2023 : श्रावण महिण्यात राशीनुसार करा महादेवाची पुजा, जलद प्राप्त होईल महादेवाचा आशीर्वाद
शिवलींगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 06, 2023 | 6:49 PM
Share

मुंबई : महादेवाची उपासना करणारे वर्षभर श्रावण (Shrawan 2023) महिन्याची वाट पाहतात कारण हा महिना महादेवाचा आवडता महिना मानला जातो. असे मानले जाते की या शुभ महिन्यात शिवभक्ताने विधीपूर्वक भगवंताची आराधना केल्यास त्याच्या जीवनाशी संबंधित सर्व दु:ख आणि संकटे क्षणात दूर होतात आणि त्याला भगवान भोलेनाथांकडून इच्छित वरदान मिळते. जेव्हा व्यक्ती आपल्या राशीनुसार शंकराची पूजा करतो तेव्हा श्रावण महिन्यात केलेल्या शिवपूजेचे फळ अधिक वाढते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने शिवाची पूजा करावी.

राशीनुसार करा महादेवाची उपासना

  • मेष: सनातन परंपरेनुसार मेष राशीच्या लोकांनी सावनातील शिवलिंगाला मध, गूळमिश्रित पाणी किंवा उसाचा रस अर्पण करावा.
  • वृषभ : ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांनी शिवाचा अभिषेक दूध आणि दह्याने करावा.
  • मिथुन : बुधाच्या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात शिवलिंगाला दुर्वा, बेलपत्र वगैरे अर्पण करून पूजा करावी.
  • कर्क: ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र देवता आहे जो भगवान शिवाच्या मस्तकाला शोभतो. या राशीच्या व्यक्तीने चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध आणि लोणी अर्पण करून पूजा करावी.
  • सिंह : ज्या राशीचा स्वामी सूर्य आहे अशा लोकांनी श्रावण महिन्यात गूळ अर्पण करून शिवाची पूजा करावी.
  • कन्या : हिंदू मान्यतेनुसार कन्या राशीच्या व्यक्तीने दररोज शिवलिंगावर गंगाजलासह बेलपत्र अर्पण केल्यास शिवाची कृपा होते.
  • तूळ : शुक्र राशीशी संबंधित असलेल्या लोकांनी श्रावणात दररोज शिवलिंगावर दूध आणि दही अर्पण करून महादेवाची पूजा करावी.
  • वृश्चिक : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत याशी संबंधित लोकांनी श्रावण महिन्यात मध किंवा गुळ अर्पण करून शिव साधना करावी.
  • धनु: धनु राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पति आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात शिवलिंगाला गायीपासून बनवलेले शुद्ध तुप अर्पण करावे.
  • मकर : मकर राशीचा स्वामी शनिदेव स्वतः आहेत. शिव साधना केल्याने संबंधित वेदना दूर होतात. अशा स्थितीत श्रावण महिन्यात शिवलिंगावर काळे तीळ अवश्य अर्पण करावेत.
  • कुंभ: कुंभ ही देखील शनिशी संबंधित एक राशी आहे, अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी पाण्यात तीळ मिसळून महादेवाला अर्पण करावे. यासोबतच शमीपत्रही अर्पण करावे.
  • मीन: गुरू ग्रहाशी संबंधित मीन राशीच्या लोकांनी केशर मिश्रित दूध भगवान शंकराला अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी