सूर्य ग्रहण ठरणार शुभ, या राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार काही तर मोठं, शनि देव नशीब बदलणार

वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण होळीच्या दिवशी होतं. आता लवकरच सूर्य ग्रहण पण लागणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी एकूण चार ग्रहण असणार आहेत.

सूर्य ग्रहण ठरणार शुभ, या राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार काही तर मोठं, शनि देव नशीब बदलणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 9:36 PM

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहण या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. ग्रहण काळामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा, इतर शुभकार्य एवढंच काय जेवण देखील करण्यास मनाई करण्यात आली आहे. वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण होळीच्या दिवशी होतं. आता लवकरच सूर्य ग्रहण पण लागणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी एकूण चार ग्रहण असणार आहेत. ज्यामध्ये दोन सूर्य तर दोन चंद्र ग्रहणांचा समावेश आहे.ज्योतिष शास्त्रानुसार नक्षत्र आणि ग्रहाप्रमाणेच ग्रहणांचा देखील राशीवर प्रभाव पडतो. याच काळात शनि देव देखील मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शनि देवांचं हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ आणि खास असणार आहे. या वर्षीचं पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च 2025 रोजी असणार आहे. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार आहे तर सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी हे ग्रहण समाप्त होणार आहे. ज्या राशींवर या ग्रहणाचा शुभ परिणाम होणार आहे, त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.

कर्क रास – कर्क राशींच्या लोकांना वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण हे खूपच शुभ ठरणार आहे. या काळात या राशींच्या लोकांना अचानक धनाची प्राप्ती होऊ शकते. विदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात देखील बढतीचे योग आहेत.

मकर रास – मकर राशीसाठी देखील हे सूर्य ग्रहण शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांना या काळात न्यायालयीन प्रकरणात मोठं यश मिळू शकतं. नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे. मान-सन्मानामध्ये मोठी वाढ होईल.पगार वाढीचा योग देखील बनत आहे.वडिलोपार्जीत एखादी संपत्नी देखील मिळू शकते.

या राशींना सावध राहण्याची आवश्यकता

सूर्य ग्रहण आणि शनिच मीन राशीत राशी परिवर्तन मेष आणि वृश्चिक राशीसाठी अशुभ ठरण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. या काळात या राशींच्या लोकांना काही समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)