AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sun Transit 2023 : तुळ राशीत होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ

सूर्य एका राशीत सुमारे 30 दिवस राहतो. त्यानंतर सूर्य दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. 30 दिवसांनी 12 राशी बदलणे म्हणजे सूर्याचे संक्रमण एका कॅलेंडर वर्षात 12 वेळा होते. सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या चंद्र राशीवर अवलंबून असतो. मुळात जन्मत: चंद्रापासून तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात असलेला सूर्य व्यक्तीला शुभ फळ देतो.

Sun Transit 2023 : तुळ राशीत होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत सूर्य त्याच्या निम्नतम राशीत राहील. शुक्राच्या राशीत सूर्य असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि प्रशासकीय कामात बदल होतील. त्यामुळे काही लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळण्याची शक्यता आहे. काही राशींना (Astrology) आर्थिक लाभ मिळू शकतो.  18 ऑक्टोबरला सूर्याने कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला. 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. तूळ राशीमध्ये आल्यानंतर सूर्य आपल्या निच स्थितीत असेल. त्यामुळे अनेक राशींवर जवळपास महिनाभर विपरीत परिणाम होऊ शकतो. तूळ राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे सत्तासंघटनेत बदल होईल.

या राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल. सूर्याच्या राशी बदलाने वृषभ, सिंह, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल. याशिवाय मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ सामान्य राहील. त्याचबरोबर मेष, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.

सूर्याचे जोतिषशास्त्रात महत्त्व

सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून आणि अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल आणि मान-सन्मानही वाढेल. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे नोकरी-व्यवसायात अडथळे येतील.

सूर्य कमजोर असल्यास वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. डोकेदुखीचा त्रास जाणवतो. कामात अडथळे येतात. वाद आणि तणावही वाढतो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या लोकांचे निद्रिस्त भाग्यही जागृत होईल.

कुंडलीतील या घरांमध्ये सूर्य शुभ फल देतो

सूर्य एका राशीत सुमारे 30 दिवस राहतो. त्यानंतर सूर्य दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. 30 दिवसांनी 12 राशी बदलणे म्हणजे सूर्याचे संक्रमण एका कॅलेंडर वर्षात 12 वेळा होते. सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या चंद्र राशीवर अवलंबून असतो. मुळात जन्मत: चंद्रापासून तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात असलेला सूर्य व्यक्तीला शुभ फळ देतो.

परंतु इतर घरातील सूर्य व्यक्तीला प्रतिकूल परिणाम देऊ शकतो. सूर्य हा अधिकार, शक्ती, पिता आणि आदराचा ग्रह असल्यामुळे करिअर आणि वैवाहिक जीवनावर वेगळा प्रभाव पडतो जिथे व्यक्तीला जवळच्या लोकांशी संवाद साधावा लागतो. सूर्याचे सकारात्मक संक्रमण सर्व नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा वरचढ होण्यासाठी असाधारण परिणाम देऊ शकते. त्याचप्रमाणे, सूर्याचे प्रतिकूल संक्रमण व्यक्तीला कमजोर बनवू शकते आणि इतरांच्या दबावाला बळी पडू शकते.

मेष राशी ही सूर्याची आवडती राशी आहे

ज्योतिषशास्त्रात सूर्य हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य हा आत्मा आणि पिता यांचा कारक आहे असेही म्हटले आहे. जर सूर्य शुभ असेल तर व्यक्ती उच्च स्थान प्राप्त करते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. यामध्ये मेष उच्च मानली जाते. तूळ राशीमध्ये सूर्य दुर्बल होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.