
वास्तूशास्रात पोपट हा एक शुभ पक्षी मानला जातो, तो पाळल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते. तसेच घरात सकारात्मकताही वेगाने वाढेते. पण पोपट पाळला तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

ज्या घरांमध्ये लहान मुले राहतात, त्यांनी पोपट पाळावा. पोपट पाळल्याने मुलांचे मन स्थिर होते. मेंदूची एकाग्रता वाढते आणि मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो.

वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व आहे. अशा स्थितीत पोपटाचा पिंजरा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते. कारण ही दिशा भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची आहे. या दिशेला पोपट ठेवल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते.

जर तुमच्या घरी पोपट असेल तर त्याच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घ्या. त्याला शक्य तितक्या फक्त हिरव्या रंगाच्या गोष्टी खायला द्या. जर तुम्ही ठेवलेला पोपट आनंदी राहिला तर घरामध्ये सारात्मकता येतो. रागावलेला पोपट घरासाठी नकारात्मकता निर्माण करतो.

पोपट घरात एकटा ठेवू नये. पोपट पाळण्याचा विचार करत असाल तर मैना सोबत ठेवा किंवा जोडीला पोपट ठेवा, पोपट-मैना ची जोडी घरात ठेवल्याने पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढते.

पोपट पाळल्याने मनोबल वाढते. नैराश्याची लक्षणे कमी होतात आणि परस्परसंवाद सुधारण्यास मदत होते. पोपट पाळल्यानं देवी लक्ष्मी, तसंच भगवान कुबेर प्रसन्न होतात.

पोपट पक्षी हा बुधाचा कारक आहे. तो घरात सुख-समृद्धीसोबतच संपत्तीत वाढ करतो. पोपटाच्या प्रभावाने संपत्ती वाढतेच. शिवाय बुद्धी तीक्ष्ण होते. घरामध्ये प्रेमसंबंध वाढतात