
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलली की काही योग जुळून येतात. काही योग शुभ, तर काही योग अशुभ मानले जातात. तर काही ग्रहांभोवती एक वलय असतं. त्या ग्रहांची स्थिती चांगली असली की त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. शुक्र ग्रह हा भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. यामुळे सांसारिक सुख, वैभव, धन, संगीत कला यासारख्या गोष्टी वाढण्यास आणि मिळण्यास मदत होते. गुरु ग्रह हा समृद्धी, अध्यात्म आणि यशाचा कारक आहे. तर सूर्य देव समाजातील मान सन्मान, सरकारी नोकरी, प्रशासकीय सेवा, वडील आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. या तीन ग्रहांच्या स्थितीमुळे नोव्हेंबर महिन्यात तीन राजयोग जुळून येणार आहे. यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. नोव्हेंबर महिन्यात हंस, मालव्य आणि बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. या योगामुळे कोणत्या राशींचं नशिब चमकणार ते जाणून घेऊयात.
मकर : या राशीच्या जातकांना करिअर आणि उद्योगधंद्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील. कारण शुक्र ग्रह या राशीच्या कर्म स्थानात उच्च स्थानी विराजमान असतील. त्यामुळे सप्तम भावात हंस राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना नवी उंची गाठता येणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. तसेच प्रमोशन आणि पदोन्नतीचा योग जुळून येऊ शकतो. व्यवसायिकांना या कालावधीत धनलाभ होऊ शकतो.
कुंभ : या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पण मालव्य, बुधादित्य आणि हंस राजयोगामुळे चांगले दिवस येतील. कारण मालव्य राजयोग नवव्या, हंस राजयोग सहाव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. या कालावधीत अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. धार्मिक कार्य हातून पार पडतील.
कर्क : या राशीच्या जातकांच्या हंस राजयोग हा लग्न स्थानात तयार होत आहे. तसेच चतुर्थ स्थानात मालव्य राजयोग होत आहे. यामुळे जातकाच्या आत्मविश्वासात वाढ होईल. इतकंच काय तर आपल्या छबीचा समोरच्यावर योग्य तो परिणाम दिसून येईल. या कालावधीत भौतिक गरजा पूर्ण होताना दिसतील. कर्जबाजारी असलेल्या लोकांच्या डोक्यावरील भार कमी होईल. आई वडील आणि सासरच्या मंडळीसोबत संबंध दृढ होतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)