AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना औषधं, ना महागाडी उत्पादने, फक्त रामदेव बाबांचे हे उपाय थंडीच्या दिवसांमध्ये सर्दीपासून तुमचं संरक्षण करतील

पतंजलीचे फाउंडर रामदेव बाबा यांनी सांगितलेल्या आयुर्वेदिक उपायांमुळे आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदिक उपायांसोबतच रामदेव बाबा योगा करण्याचा देखील सल्ला देतात.

ना औषधं, ना महागाडी उत्पादने, फक्त रामदेव बाबांचे हे उपाय थंडीच्या दिवसांमध्ये सर्दीपासून तुमचं संरक्षण करतील
रामदेव बाबा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 9:09 PM
Share

पतंजलीचे फाउंडर रामदेव बाबा यांनी सांगितलेल्या आयुर्वेदिक उपायांमुळे आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदिक उपायांसोबतच रामदेव बाबा योगा करण्याचा देखील सल्ला देतात. रामदेव बाबा बदलल्या ऋतुनुसार विविध आयुर्वेदिक उपाय सांगत असतात, जे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. सध्या हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला या सारखे आजार होत असतात. हे आजार टाळण्यासाठी केवळ थंडीपासून स्वत:चा बचाव करणंच पुरेसं नाहीये तर आतून देखील शरीराला गरम ठेवणं महत्त्वाचं असतं, रामदेव बाबा यांनी असे काही उपाय सांगितले आहेत, ज्याद्वारे तुम्ही थंडीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून तुमचा स्वत:चा बचाव करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात रामदेव बाबा यांनी कोणते उपाय सांगतिले आहेत.

काळी मिरी आणि बदाम – थंडीच्या काळात शरीराला नैसर्गिकरित्या गरम ठेवण्यासाठी बदाम आणि काळ्या मिऱ्याचा हा उपाय खूप लाभदायक ठरू शकतो. रामदेव बाबा यांनी याबाबत माहिती दिली आहे, रोज पाच बदाम आणि पाच काळी मिरी चावून खावीत, यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे तुमचा सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून बचाव होतो.

हळीदीचं दूध आणि मध – रामदेव बाबा म्हणतात हिवाळ्याच्या दिवसांत दररोज हळदींच दूध किंवा गरम पाण्यामध्ये थोडा मध मिक्स करून त्याचं सेवन करावं, त्यामुळे शरीर आतून गरम राहते आणि सर्दीपासून तुमचा बचाव होतो.

केसरचा उपाय – केसर हे खूप महाग असते, मात्र केसरच्या नियमित सेवनामुळे तुमचं शरीर उबदार राहतं. केसरमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात, त्यामुळे दररोज केसरचं थोड सेवन करावं असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

गावरान तूप – ज्यांची रोगप्रतिकार शक्ति ही खूप कमजोर आहे, अशा लोकांनी दररोज सकाळी -सकाळी थोडं गावरान तूपाचं सेवन केलं पाहिजे असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे, यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. थंडीपासून तुमचा बचाव होतो.

पावर योगा आणि सूर्य नमस्कार – रामदेव बाबा म्हणतात दररोज योगा केल्यामुळे देखील शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. योगामुळे शरीरामध्ये गरमी निर्माण होते. त्यामुळे रामदेव बाबा यांनी पावर योगा, दंड बैठका आणि सूर्य नमस्कार घालण्याचा सल्ला दिला आहे. नियमित व्यायाम केल्यानं तुमचं शरीर सक्रिय राहतं, तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.