AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G भारतात लाँच, या किमतीत मिळतील जबरदस्त फिचर्स

AI+ Nova 2 सिरीजमध्ये AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G हे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहे. ही सिरीज 6000mAh बॅटरीसह येते. चला या नवीन स्मार्टफोन्सच्या किंमती, विक्रीची तारीख आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G भारतात लाँच, या किमतीत मिळतील जबरदस्त फिचर्स
AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 3:05 PM
Share

भारतीय बाजारपेठेत AI+ Nova 2 सिरीजचे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. या लाइनअपमध्ये AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन्स पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या नवीन सिरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000 mAh बॅटरी आहे. चला, दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, विक्रीची तारीख आणि वैशिष्ट्ये आजच्या लेखात जाणून घेऊयात.

AI+ Nova 2 5G ची भारतात किंमत

भारतीय बाजारपेठेत या नवीन स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रूपये आहे. कंपनीने अद्याप 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही. त्यातच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा फोन ब्ल्यू, ब्लॅक, पिंक, ग्रीन, आणि पर्पल या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

AI+ Nova 2 Ultra 5G ची भारतात किंमत

या डिव्हाइसच्या 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. तर या प्रभावी किंमतीमध्ये बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसचा समावेश असू शकतो. कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा हँडसेट 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हे डिव्हाइस ब्ल्यू, ब्लॅक, रेड, ग्रीन, आणि पर्पल रंगांमध्ये खरेदी करू शकता.

AI Plus Nova 2 Ultra वैशिष्ट्य

स्क्रीन: अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि कमाल ब्राइटनेस 2500 nits आहे.

चिपसेट: अल्ट्रा मॉडेलमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेटचा वापर केला जातो.

कॅमेरा: अल्ट्रा मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX752 कॅमेरा सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.

AI Plus Nova 2 5G वैशिष्ट्य

स्क्रीन: या फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये युनिसॉक टी8200 ऑक्टा कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे, तर समोरच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

सामान्य वैशिष्ट्य

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये पॉवरफूल 6000mAh बॅटरी आहे, फरक एवढाच की अल्ट्रा मॉडेलमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे, तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....