AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी समोर येत आहे, अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर
Ashok Kharat Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 2:59 PM
Share

सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. एका पीडित महिलेनं नाशिकचा भोंदू असलेल्या अशोक खरात याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान त्यानंतर त्याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत त्याच्यावर महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची नियुक्ती करण्यात आली असून, एसआयटीकडून देखील त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणाता आता रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.  भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना आज शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.  भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली होती. समता पतसंस्थेत अनेक खाती अशी आहेत, जी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहेत, मात्र नॉमीनी स्वत: अशोक खरात हाच आहे.  या खात्यांवरून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.

प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावेही समता पतसंस्थेत चार खाती आहेत. या सर्व खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 33 खातेदारांनी जबाब नोंदवले  आहेत. प्रतिभा चाकणकर यांनाही जबाब देण्यासाठी शिर्डीत पोलीस ठाण्यात आता हजर राहावं लागणार आहे. शिर्डी पोलीसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्यांवर पोस्टाने नोटीस पाठवण्यात आली आहे.  पुढच्या पाच दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे.  दरम्यान भोदू अशोक खरातसोबतचे फोटो समोर आल्यामुळे राज्यातील काही नेत्यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!