12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पतींचा मिथुन राशीत उदय, या राशींची पैशांची गणित सुटणार!
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत उदय आणि अस्ताला जाणं ही स्थितीही खूपच महत्त्वाची आहे. 12 वर्षानंतर गुरु ग्रह मिथुन राशीत आहे. तसेच 9 जुलैला उदय झाला आहे. त्यामुळे काही राशींचा पैशांचा प्रश्न सुटणार आहे.

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचं महत्व खूप आहे. गुरु ग्रह हा ज्ञान, धन, संतान, विवाह आणि नशिबाचा कारक आहे. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीतून 9 जुलैला याच राशीत उदय झाला आहे. खरं तर एखादा सूर्याच्या अगदी जवळ गेला की त्याचं तेज कमी होतं. त्या स्थिती अस्ताला जाणं असं म्हणतात. पण आता गुरु ग्रहाला स्वतचं असं तेज प्राप्त झालं आहे. याच स्थितीत गुरु ग्रह 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाचा मिथुन राशीतील उदय तीन राशीच्या जातकांसाठी लाभदायी सांगितला गेला आहे. चंद्र राशीच्या स्थितीवरून या स्थितीची फळं तीन राशींना मिळणार आहेत.
या तीन राशीच्या जातकांना मिळणार फळ
मकर : या राशीच्या सहाव्या स्थानात गुरु ग्रहाचा उदय झाला आहे. गुरु ग्रहाची दृष्टी दहाव्या, बाराव्या आणि धन स्थानावर आहे. तसेच शनि तिसऱ्या स्थानावर असून त्याची दृष्टी बाराव्या स्थानावर आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. खासकरून आर्थिक गणित या काळात सुटणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना योग्य फळ या काळात मिळणार आहे. नव्या उद्योगधंद्याच्या शोधात असलेल्यांना लाभ मिळू शकतो.
धनु : या राशीच्या सातव्या स्थानात गुरु उदय होणार आहे. या राशीचा स्वामी ग्रहही गुरु आहे. गुरूची दृष्टी एकादश, लग्न आणि तिसऱ्या स्थानावर असणार आहे. त्यामुळे या काळात प्रगतीची नवी दारं खुली होतील. गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेली कामं मार्गी लागतील. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील. सातवं स्थान हे भागीदारीच्या धंद्यासाठी योग्य मानलं जातं. त्यातही अपेक्षित फळ मिळू शकते.
कुंभ : या राशीच्या पंचम स्थानात गुरु ग्रहाचा उदय होत आहे. गुरु ग्रहाची दृष्टी नवव्या, एकादश आणि लग्न भावावर असणार आहे. या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशातून धनलाभ होऊ शकतो. या काळात अध्यात्मिक प्रगती होईल. देवदर्शनला जाण्याचा योग जुळून येईल. रोजगाराच्या नवीन संधी चालून येतील. आर्थिक मदत देण्यापूर्वी या काळात काळजी घ्या. कारण साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
