AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 23 May 2022: वेळ तुमच्याबाजुने, महत्त्वाची कामं आजच उरका, कोणत्या राशीत काय जाणून घ्या?

कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी? आज तुमचे ग्रह तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 23 May 2022:  वेळ तुमच्याबाजुने, महत्त्वाची कामं आजच उरका, कोणत्या राशीत काय जाणून घ्या?
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 5:15 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मकर (Capricorn) –

ग्रहांची स्थिती समाधानकारक आहे. मन:शांतीच्या पलीकडे जायचे आहे. पूर्वी ज्यालोकांनी विरोध केला होता, कधी तुम्हाला दोषी ठरवले होतो. आज त्यांच्या समोर तुमचे निर्दोषत्व सिद्ध होईल.फक्त शो ऑफच्या नावाखाली खूप खर्च करायचे आणि कर्ज घेणं टाळा. तसंच, तुम्ही कोणाला दिलं असेल तर ते वचन पूर्ण करा, नाहीतर तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. अतिविचारात वेळ घालावल्याने हातातील संधी जाऊ शकतात. व्यवसायातील कामं आहेत तशी सुरू राहतील. कामात बदल करणं गरजेचं आहे. नोकरदार व्यक्तींना लवकरच बदलीची शक्यता.

लव फोकस – प्रेमप्रकरणात पडण्याची शक्यता. नवरा बायकोचे संबंध सुधारतील.

खबरदारी – स्वास्थ्य ठीक राहील. बदलत्या वातावरणामुळे एलर्जी सारखी समस्या होईल.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

कुंभ (Aquarius) –

आज, काही अडचणींचा सामना करावा लागला तरीही, तुम्ही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचाराने पुढे जाल आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. भावनिकतेऐवजी तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.पण, कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक तूर्तास स्थगित करा. कारण पैशाशी संबंधित काही हानीकारक प्रसंग घडण्याची शक्यता. भावांसोबत चालू असलेला मालमत्ता किंवा विभागणीचा वाद मध्यस्थीने सोडवा. व्यावसायिक कामांमध्ये कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामात वाढही देईल. व्यवहाराशी संबंधित कामात अचानक काही फायदा होईल.

लव फोकस – कौटुंबिक वातावरण खुश राहील. जवळच्या लोकांच्या भेटी होतील.

खबरदारी – तब्येत ठीक राहील. पण, वातावरणातील बदलांमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

मीन (Pisces) –

आर्थिक समस्येतून सुटका होतील.  कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्हाला पुन्हा फ्रेश वाटेल. तुमच्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर करा.काही वेळा तुमचे लक्ष एखाद्या चुकीच्या कामाकडे जाऊ शकते, ज्यामुळे समाजात अनादर आणि बदनामी होण्याची शक्यता असते. आपले विचार आणि वेळ सकारात्मक कामात गुंतवा. कार्यक्षेत्रात सध्या योग्य बदल होण्याची शक्यता नाही, त्यामुळे सध्या काय चालले आहे यावर लक्ष केंद्रित करा. वेळ गुंतवणे तुमच्या हिताचे आहे. तसेच, बाहेरची कामं फायदेशीर ठरतील.

लव फोकस – मुलां प्रती शुभ सूचना मिळेल. घरात वातावरण आनंदाचे असेल. घरात पाहुण्याच्या आगमनाने वातावरण अधिक आनंदी आणि खुश असेल.

खबरदारी – स्वास्थ्य ठीक राहील. कोणतीही काळजी करू नका. पण काळजी घ्या

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.