Today Rashi Bhavishya: धनत्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना मिळणार लक्ष्मीची साथ? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today Friday 6 November 2026: धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कोणत्या संधी आणि बदल घेऊन येणार आहे? आज काही राशींना आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते. जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे राशीभविष्य.

६ नोव्हेंबर २०२६, शुक्रवारचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने खास आहे. आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार असून या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो.
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर होऊ शकतो. काही राशींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना खर्च आणि नातेसंबंधांबाबत काळजी घ्यावी लागू शकते. जाणून घेऊया मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
मेष
रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दिलासा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
वृषभ
कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवू शकतो, मात्र दिवसाच्या शेवटी परिस्थिती नियंत्रणात येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी महत्त्वाची चर्चा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन
कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ चांगला आहे. व्यवसायातही छोट्या यशामुळे आनंद मिळेल.
कर्क
घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणीही नवीन जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.
सिंह
आजचा दिवस यश आणि दिलासा घेऊन येईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. एखादे जुने काम पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या
कामाचा व्याप वाढू शकतो. मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. पुरेशी विश्रांती घ्या.
तूळ
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबीयांची साथ मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल. वाढत्या खर्चाकडे लक्ष द्या.
वृश्चिक
कामाच्या व्यापामुळे धावपळ होईल. कामाचा ताण असला तरी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.
धनु
आज नशीब तुमची साथ देईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती होईल. प्रवासाचे योग आहे. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.
मकर
कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहिल. नोकरीत केलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले एखादे काम पूर्ण होईल.
कुंभ
नवीन संधी मिळेल. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांसोबत वेळ चांगला जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन
दिलासा देणारा दिवस. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात हळूहळू सुधारणा दिसून येईल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. मन प्रसन्न राहिल.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)