AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 29 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना हितशत्रूचा भास जाणवेल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 29 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 29, 2023 | 12:01 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. विधायक कार्य हातून घडेल.

वृषभ

खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. घर वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास लाभदायक होतील.

मिथुन

नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहइच्छुकांचे विवाह जमतील. निरनिराळ्या सुचनाच्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातून मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

कर्क

आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. चंद्रबल उत्तम लाभलेले आहे. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. सामाजिक राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

सिंह

मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशाजनक वातावरण राहील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.

कन्या

विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. व्यवाहारिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी राहाल.

तुला

भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातून लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळींना नवीन व्यापार सुरू करण्याकरिता उत्तम दिनमान आहे.

वृश्चिक

मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य घडेल. दूरवरच्या प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संथी मिळेल. साधुसंत व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.

धनु

दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भभवू शकतो. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिकहानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल.

मकर

वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्साहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. दिनमान उत्साहवर्धक राहील.

कुंभ

संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये, याची काळजी घ्या. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्ती मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल.

मीन

स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?