AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 27 जुलै 2023, या राशीच्या लोकांसोबत मानपमानाचे प्रसंग घडतील

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकूल दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 27 जुलै 2023, या राशीच्या लोकांसोबत मानपमानाचे प्रसंग घडतील
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 27, 2023 | 12:01 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज आपल्या कार्यक्षेत्रात कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे. आज प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहकार्यामुळे आपली कार्यक्षमता वाढणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध जुळतील.

वृषभ

आज  रोजगारात नवीन प्रयोग आमलात आणण्यासाठी उत्तम दिवस आहे. नियोजनबद्ध कार्यात प्रगती होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना अनुकुलता लाभेल. मुलाची विद्याभासात प्रगती होईल.

मिथुन

आज व्यापारात नवीन प्रकल्प कामे मिळतील. मोठे आर्थिक लाभ होईल. यशदायक दिनमान आहे. उद्योगक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकूल दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल.

कर्क

आज नोकरीत महत्वाची कामे सहजरीत्या मार्गी लागतील. केलेल्या कार्याचा योग्य मोबदला पदरी पडेल. आनंददायी दिवस आहे. मन प्रसन्न प्रफुल्लीत राहिल. उर्जा आणि उत्साह वाढेल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक राजकीय कार्यातून लाभ होईल. आपल्या कार्यात मग्न राहा. व्यापार रोजगारात व्यवसायानिमित्त्त दुरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल.

सिंह

कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. उद्योग व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. शारिरिक स्वास्थ सांभाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. प्रकृती विषयी तक्रारी निर्माण होईल. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल.

कन्या

आज मानसिक दृष्टीकोनातून काहीसं पिडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. मानसिक अस्वस्थता वाढीस लागेल. स्वःतावर नियंत्रण ठेवा. रोजगारात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. अंहमपणा वाढीस लागेल.

तुला

आज व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप संघर्ष करावा लागेल. व्यवसायातील स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमानाचे प्रसंग घडतील. मात्र एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ  मिळतील. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे.

सिंह

आज नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. उद्योग व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. शारिरिक स्वास्थ सांभाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. प्रकृती विषयी तक्रारी निर्माण होईल. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल.

तुला

आज व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप संघर्ष करावा लागेल. व्यवसायातील स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमानाचे प्रसंग घडतील. मात्र एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ  मिळतील. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा.

वृश्चिक

आज नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. नवनवीन योजना आमलात येतील. काही कल्पना सुचल्यास आमलात आणा. सुखदायी दिवस आहे. आपणासाठी मान सन्मान प्रतिभा वाढविणारा दिवस आहे. मनोबल आत्मविश्वास वाढेल. साहसी निर्णय घ्याल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील.

धनु

आज नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यापार व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडा कडून आर्थिक सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक कारणास्तव खर्चात वाढ होईल. वास्तू खरेदी करण्याचा योग आहे. वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण समाधानी राहिल. सुख व शांतीचे वातावरण राहिल.

मीन

आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. प्रकल्प पुर्णत्वास येतील. आर्थिक लाभासाठी खुप उलाढाली कराल. मित्रमैत्रिणी अथवा वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. मुलांच्या प्रकृतीवर लक्ष राहु दया. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?