AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 29 जानेवारी 2023, ‘या’ राशीच्या लोकांना आज यश प्राप्त होईल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांनी आज वाहन सावकाश सांभाळुन चालवा.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 29 जानेवारी 2023, 'या' राशीच्या लोकांना आज यश प्राप्त होईल
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 29, 2023 | 12:42 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

जाणून घ्या बारा राशींचे राशी भविष्य

मेष :

आज आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकेल. व्यापारवर्गासाठीही अनुकुल वातावरण आहे. धनप्राप्तीत वाढ होईल. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी योग दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल. गृहसौख्य उत्तम राहील.

वृषभ:

आज कलह, वादविवादाचे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. चतुर्थातून हे भ्रमण होत असल्याने वाहन घर खरेदी व्यवहार टाळा.मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुंतले जाल. व्यापारउद्योगात व्यवहार जपून करावेत.आर्थिक हानी संभवते. स्वभावात मानीपणा, अहंकार आणि भोगीविलास मनोवृत्ती बळावेल.धरसोड वृत्ती टाळा. कौटुंबात वाद-विवाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन :

आज शुभ दिवस आहे. बौधिक क्षेत्रात कार्यरत असणाया व्यक्तीकडून उत्तम कार्य घडतील. विद्वत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. राजाश्रय मिळेल. सामाजिक व्यक्तींना पद, मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणारआहे. नोकरी, व्यवसायात भरभराटीचा दिवस आहे. मनाजोग्या घटना घडतील. घरात मंगलकार्य,आनंदाच प्रसन्न वातावरण राहील. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. दिनमान उत्तम राहील

कर्क:

आज धनलाभ, आर्थिक उत्कर्ष, उत्पनात वाढीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम दिनमान आहे. संधीचा फायदा घ्या. केतूच्या नक्षत्रातील भ्रमण आकस्मिक धनलाभ घडवेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी, व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील. त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस आहे. मन प्रसन्न राहील, प्रगतीकारक दिनमान आहे.

सिंह :

आनंददायी, मनात प्रसन्नता राहील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल. मित्रपरिवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थीवर्ग, संतती करिता हा दिवस सुखप्रद आहे. मन शांत ठेवा. स्थिर ठेवा.

कन्या:

आज आपल्या चिंता निर्माण करणारा दिवस आहे. मनोबल फारसे चांगले राहणार नाही. मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहील. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल. चितन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे. मनामध्ये कुंटुंबातील सदस्याप्रती चिंता निर्माण होईल. अकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाल. संयम ठेवावा.

तुला:

दिनमान उत्साहवर्धक राहील. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे.वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे.प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. यश लाभेल.

वृश्चिक:

आज आपल्या योजना सफल करणारा दिवस आहे. संकुचित मनोवृति टाळा.उत्साहाने काम करा. यश निश्चित लाभेल. प्रयत्नांना वेग येईल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. ग्रहयोगाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. नोकरीत जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बढ़तीचे योग आहेत. व्यवसायातही आज लाभाचा दिवस आहे.मुलाखतीत यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील.प्रवासातून लाभ घडतील.

धनु:

आजचा दिवस भाग्यकारक आहे. मनात प्रसन्नता राहील. आध्यात्मिक वातावरणात रमाल. देवधर्मासाठी खर्च कराल. आत्मसुख आणि आनंदाची प्रचिती घ्याल. आध्यात्मिक प्रगतीला पोषक दिवस आहे.नोकरी, व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल. सरकारी कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. अविवाहितांना विवाह योग आहे. प्रयत्नाच्या जोडीला लागणारे भाग्य आज आपल्या सोबत आहे.धडाडीने केलेल्या सर्व कामात निश्चित यश मिळणार आहे.

मकर:

आजचा दिवस कष्टदायक आहे. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. पैशाच्याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर संशय घेतला जाईल. मनस्ताप होईल. सुखात अडथळे निर्माण होतील. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. साडेसातीच्या तृतीय चरणातील प्रभावामुळे नोकरी, व्यवसायात बऱ्यापैकी ताणतणाव जाणवेल. आज वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. वातावरण तापदायक राहणार आहे.कौटुंबिक आयुष्यात नवीन समस्या उद्भभवू शकतात.मनाचा समतोल ठेवा. संयमाने वागा.

कुंभ:

केंद्रातून होणारं गोचरीय चंद्रभमण पत्नी कौटुंबिक सौख्य उत्तम मिळणार आहे. प्रसन्नता पूर्वक दिवस व्यतीत होईल.घरात नातेवाईकांचे आगमन होईल. संततीकडूनही समाधानकारक स्थिती राहील. आज स्वताःवरचा विश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी येतील. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल. वातावरण अनुकुल आहे. आर्थिक उत्पन्न वाढीस लागेल.समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहील.नवे नाते संबंध जुळतील. नातेवाईकांकडून साथ मिळेल. दिनमान शुभ राहील.

मीन:

आपल्या आरोग्याबाबतीत समस्या निर्माण होतील. प्रकृती अस्थिर राहील. मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरी, व्यवसायात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि भावनिक गोंधळ उडेल. थोडेफार नैराश्य देणारा दिवस आहे. गैरमार्गाचा अवलंब टाळा. अंगलट येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादया सदस्यावर आरोग्य, औषध यावर खर्च वाढेल. हितशत्रुपासून त्रास होण्याची शक्यता आहे. मनस्तापासारख्या घटना संभवतात. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा.संयम ठेवून वाटचाल करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा