मकर राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक बाबतीत यश मिळू शकेल, तणावामुळे डोकेदुखी, मायग्रेनची समस्या वाढू शकेल

| Updated on: Jul 26, 2021 | 12:47 AM

विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक बाबतीत यश मिळू शकेल. परंतु आळशी वृत्तीला वरचढ होऊ देऊ नका. यामुळे तुमची काही कार्ये थांबू शकतात.

मकर राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक बाबतीत यश मिळू शकेल, तणावामुळे डोकेदुखी, मायग्रेनची समस्या वाढू शकेल
Rashibhavishya for Capricorn people
Follow us on

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मकर राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Capricorn Rashifal(मकर राशीफळ) 26 जुलै-

यावेळी ग्रहांची स्थिती चांगली आहे. म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा. राजकीय गोष्टींमध्ये संबंधित एखाद्याची मदत आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक बाबतीत यश मिळू शकेल. परंतु आळशी वृत्तीला वरचढ होऊ देऊ नका. यामुळे तुमची काही कार्ये थांबू शकतात. घरात पाहुण्यांचे अचानक आगमन झाल्याने जास्त खर्च होईल तसेच तुमची वैयक्तिक कामे खोळंबू शकतात.

सरकारी कामाशी संबंधित व्यवसायातील कामे पूर्ण करण्याचे आपले धोरण यशस्वी होईल आणि तुम्हाला यशही मिळेल. परंतु आपली उपस्थिती कामाच्या ठिकाणी ठेवणे फार महत्वाचे आहे. भागीदारी व्यवसायात काही गैरसमज असू शकतात.

प्रेमसंबंध – घराचे वातावरण शिस्तबद्ध व चांगले ठेवण्यात पती-पत्नी दोघांचेही संपूर्ण सहकार्य असेल. प्रेमसंबंधांमध्येही जवळीकता वाढेल.

खबरदारी – तणावामुळे डोकेदुखी, मायग्रेनची समस्या वाढू शकते. सकारात्मक रहा आणि व्यायामदेखील करा.

भाग्यवान रंग – क्रिम
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 8

 

लेखक अजय भांबी-
डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.