AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 25 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मनासारख्या घटना घडतील.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 25 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 25, 2023 | 12:05 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. संततीची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका.

वृषभ

नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. राहु-हर्षल-चंद्र युतीत अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो. मात्र, अति आत्मविश्वास आणि अति उत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असू द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. चंद्र मनाचा कारक असल्याने मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.

मिथुन

शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस ठरेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील . कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकूल दिवस आहे.

कर्क

कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

सिंह

नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण होतील. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायद्याची जाणवेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.

कन्या

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील.  मानसिक स्वास्थाबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. मागील स्मृती उजाळल्याने दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

तुला

व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहू नका, अन्यथा फसवणूक आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे.  बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे.  एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. विरोधक आक्रमक होतील, त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक

नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी, समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. आपल्याविरोधात काहूर उठेल. मोठे व्यवहार,उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.

धनु

आज संयमी भूमिका घेतली तर मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देण्या-घेण्यात सावधानी बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल, त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील.

मकर

घरासंबंधी समस्या दूर होतील. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिक बाबतीत फायद्याचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. समाजकारणात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस ठरेल. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मानसन्मान मिळेल. कर्तुत्व सिद्ध करू शकाल. विधायक कार्य घडेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करू नका.

मीन

मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल. विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...