Valentine’s Day 2022 | आपल्या आवडत्या व्यक्तीकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ ला प्रेमाची कबुली मिळवायची आहे? मग तुमच्या राशीनुसार या रंगांचे कपडे परिधान करा!

व्हॅलेंटाईन डेला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घातलेत तर तुम्हाला प्रेमात यश नक्की मिळेल !

Valentine’s Day 2022 | आपल्या आवडत्या व्यक्तीकडून व्हॅलेंटाइन डे ला प्रेमाची कबुली मिळवायची आहे? मग तुमच्या राशीनुसार या रंगांचे कपडे परिधान करा!
Zodiac
| Updated on: Feb 08, 2022 | 9:41 AM

मुंबई : काही दिवसातच व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day)येऊन ठेपला आहे. प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लोक आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेमाच्या (Love) भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूप योग्य मानला जातो. फेब्रुवारी (February) महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात.रंगांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंदासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार कपड्यांचे रंग निवडल्यास व्हॅलेंटाइन डेला तुमच्या आयुष्यात आनंद मिळू शकतो. या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घातलेत तर तुम्हाला प्रेमात यश नक्की मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते रंग.

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाचा रंग लाल आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी कोणत्याही शुभ प्रसंगी लाल रंगाचे कपडे परिधान केले तर ते त्यांच्यासाठी शुभ असते. तसेच व्हॅलेंटाईन डेला लाल रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांच्यात परस्पर सौहार्द आणि प्रेम वाढेल. एवढेच नाही तर प्रामुख्याने या रंगाची निवड पती-पत्नीमधील पत्नीसाठी खूप फायदेशीर ठरेल.

वृषभ राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाइन डेला हिरवे कपडे परिधान करणे फायदेशीर ठरेल. हिरवा हा एक चांगला रंग आहे जो मनात सकारात्मक विचार आणतो आणि मनातील प्रेमाचा संचार करतो. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेला तुम्ही हिरवे कपडे परिधान केलेच पाहिजेत.

मिथुन राशीच्या लोकांसाठी पिवळा किंवा भगवा भाग्यवान रंग आहे . पण त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला छान वाटावे म्हणून गुलाबी रंगाचा ड्रेस देखील तुम्ही परिधान करु शकता. त्यामुळे तुमच्यात परस्पर सौहार्दही वाढेल. या दिवसासाठी तुम्ही गुलाबी रंगाची कोणतीही हलकी छटा निवडू शकता.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी जोडीदाराला खूश करण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान केले तर खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही विवाहित असाल तर लाल कपड्यांची निवड तुमचे आणि तुमच्या पतीमधील नाते अधिक घट्ट करेल.

सिंह राशींच्या लोक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवणार आहात. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. या रंगाचे कपडे परस्पर सौहार्द राखण्यास मदत करतील.

कन्या राशीचे लोक व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी निळ्या रंगाचे पोशाख निवडू शकतात. या रंगांची निवड परस्पर सौहार्द राखण्यास मदत करेल.

तूळ राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी काळे कपडे परिधान केले तर ते त्यांच्यासाठी चांगले राहील आणि परस्पर सौहार्द वाढेल.लोकांनी कोणत्याही शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केली तर ते शुभ मानले जात नाही पण या दिवशी तूळ राशीसाठी  हा नियम लागू होत नाही.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भगवा रंग सर्व राशींसाठी शुभ मानला जातो, परंतु विशेषतः व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी भगव्या रंगाचे कपडे परिधान करणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.

धनु राशीचे लोक व्हॅलेंटाईन डे वर एक सुंदर गडद लाल ड्रेस परिधान करून त्यांच्या जोडीदाराला प्रभावित करू शकतात. धनु राशीच्या लोकांसाठी हा रंग शुभ आहे. लाल रंग हा विशेषत: प्रेमाचा रंग आहे.

मकर राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाईन डेला क्रीम रंगाचे कपडे परिधान केले तर ते त्यांच्यासाठी खूप शुभ असेल. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी या लोकांनी व्हॅलेंटाइन डेला आपल्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी क्रीम रंगाचे कपडे घालावेत.

कुंभ राशींच्या लोकांनी व्हॅलेंटाईन डेला तुमच्या जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी बॉटल ग्रीन कलरचे कपडे घाला. या रंगाचे कपडे तुमच्या जीवनात आनंद आणण्यास मदत करतील.

मीन राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाईन डेला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तर ते त्यांच्यासाठी चांगले राहील. या राशीच्या लोकांसाठी, पांढरा रंग जीवनात प्रेम आणि आनंद आणण्यास मदत करेल.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

08 February 2022 Panchang | 8 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?