Vastu tips : चुंबकासारखा पैसा खेचते घराच्या मुख्य दारावर लावलेली ही वस्तू, प्रगतीचे मार्ग उघडतात

वास्तू तज्ज्ञांच्या मते घराच्या मुख्य दरवाजावर ठेवलेल्या या वस्तूमुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. जर तुम्हीही घरामध्ये ही वस्तू बसवण्याचा विचार करत असाल तर ते बसवण्यापूर्वी त्याचे फायदे जाणून घ्या.

Vastu tips : चुंबकासारखा पैसा खेचते घराच्या मुख्य दारावर लावलेली ही वस्तू, प्रगतीचे मार्ग उघडतात
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 4:59 PM

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu tips) अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरामध्ये योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास शुभ परिणाम मिळू शकतात. या गोष्टी घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. घरात सुख-समृद्धी येते. माता लक्ष्मीचा कायम वास असतो. तसेच या वस्तू एखाद्या विशिष्ट दिवशी घरात ठेवल्यास त्यांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. यापैकी एक गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य. वास्तु तज्ज्ञांच्या मते घराच्या मुख्य दरवाजावर ठेवलेल्या तांब्याच्या सूर्यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. जर तुम्हीही घरामध्ये तांब्याचा सूर्य बसवण्याचा विचार करत असाल तर ते बसवण्यापूर्वी त्याचे फायदे जाणून घ्या. तसेच ते कोणत्या दिशेला लावणे फायदेशीर आहे तेही जाणून घ्या

घराच्या या दिशेला लावा तांब्याचा सूर्य

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तांब्याचा सूर्य स्थापित करण्याचा विचार करत असाल तर रविवारी त्याची प्रतिष्ठापना करणे उत्तम मानले जाते. वास्तू तज्ज्ञांच्या मते, याशिवाय संक्रांतीसारख्या दिवशीही हे घरामध्ये लावले जाऊ शकते. तांब्याचा सूर्य लावूनही वर्षाची सुरुवात करता येते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर लावता येते. या दिशेने सूर्य लावणे खूप फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला घराच्या आत स्थापित करायचे असेल तर तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला स्थापित केला जाऊ शकतो. हे घराच्या मुख्य दरवाजावर देखील टांगता येते.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तूमध्ये कोणतीही गोष्ट लावण्यासाठी योग्य दिशा असते. त्याचप्रमाणे काही ठिकाणे अशी आहेत जिथे चुकूनही ते लावू नये. जर तुमच्या तांब्याला तडे गेले किंवा तुटले असतील तर ते ताबडतोब काढून टाका. वास्तुशास्त्रात अशा तुटलेल्या वस्तू बसवण्यास मनाई आहे. या गोष्टी घरात ठेवल्याने नकारात्मकता येते.याशिवाय घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी. यामुळे घरात सकारात्मकता राहते.

वास्तु तज्ज्ञ सांगतात की, तांब्याचा सूर्य घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये गोडवा राहतो.त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. दुसरीकडे, आयुष्यात मानसन्मान मिळवण्यासाठी घरात तांब्याचा सूर्य अवश्य ठेवा. वास्तु तज्ज्ञांच्या मते, यश मिळवण्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी तांब्याचा सूर्य अवश्य स्थापित करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.