
मुंबई : हिंदू धर्मात गंगाजलाला (Gangajal) विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते. गंगा मातेला मोक्षदाता म्हणतात. त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे. गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत. या कारणास्तवही गंगाजल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार, गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन शुद्ध होतात. या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात. पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते. जवळजवळ सर्व हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात, परंतु गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत, तरच गंगाजल घरात ठेवल्यास फायदा होतो.
बहुतेक लोक प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात गंगाजल घेऊन घरी येतात आणि ते अशा प्रकारे घरात ठेवतात, जे अत्यंत चुकीचे मानले जाते. गंगेचे पाणी अतिशय पवित्र आहे, त्यामुळे ते ठेवण्याचे पात्रही शुद्ध असावे. चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या भांड्यात गंगाजल ठेवणे योग्य मानले जाते.
मान्यतेनुसार, गंगाजल स्वच्छ आणि गडद ठिकाणी ठेवावे. गंगाजल ठेवण्यासाठी फक्त गडद आणि स्वच्छ जागा शुभ मानली जाते. गंगाजल सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी किंवा उघड्यावर ठेवू नये. गंगाजल स्वयंपाकघर किंवा स्नानगृहाजवळ ठेवू नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)