AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 1 ते 7 मे 2023, या राशीच्या लोकांना शत्रुपासून सावध राहण्याची गरज

साप्ताहिक राशी भविष्य. जाणून घ्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणार. या राशीच्या लोकांना पैतृक संपत्ती मिळेल.

Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 1 ते 7 मे 2023, या राशीच्या लोकांना शत्रुपासून सावध राहण्याची गरज
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 30, 2023 | 4:46 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक (Weekly Horoscope), मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य

मेष

प्रवास होतील आणि सामाजिक जीवनात अनेक नवीन संधी चालून येतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राशीतील रवि राहू एक प्रकारे भ्रम निर्माण करेल. एकच विचार कराल. कमरेचे वा तत्सम डोक्याचे विकार त्रास देतील. चंद्र भ्रमण आणि अमावास्या संतती दृष्ट्या फळ देईल. कुंभेचा शनी लाभदायक आहे. मित्र साथ देतील. कार्य करीत रहा आणि उत्तम फळ प्राप्त करा. नवीन संधी साठी तयार रहा..लौकर बदल होतील. अधिकारी व्यक्ती मदत करतील. परदेश संबंधी कार्य होतील. अमावास्या काळात शिव उपासना करा. सप्ताह उत्तम.

वृषभ

राशी स्वामी शुक्र स्वराशीत असून अनेक विशेष कार्यक्रम होतील. मित्र सहयोग मिळेल. मातृ पितृ सुख मिळेल.परदेश प्रवास होतील. मंगळ आर्थिक दृष्ट्या मध्यम फळ देईल. कार्य क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. नेहमीप्रमाणे घर आणि व्यवसाय यात धावपळ होणार आहे. तरी प्रकृती जपून असावे. व्यय स्थानातील बुध आणि रवि राहू परदेश योग आणतील. कायदा पाळा. अमावास्या कार्यक्षेत्रात आणि प्रकृती जपून रहा असे संकेत देत आहे. सप्ताह मिश्र फळ देईल.

मिथुन

राशी स्वामी बुध लाभ स्थानात पैसाआणि मान देईल.आयुष्य मौजमजा सहल यात आनंदात जाईल. शनि ची साथ नवीन संधी आणि परदेश गमन यासाठी उत्तम राहील. राशी चे भाग्यस्थानात येणारा चंद्र प्रवासी प्रवृत्त्ती करेल. गुरू महाराज कर्म स्थान आणि सुख स्थानावर शुभ दृष्टी ठेवून आहेत . नवीन वास्तू किंवा वाहन यासाठी प्रयत्न करा. मंगळ तामसी वृत्ती करेल..सध्या प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष असू द्या. शारीरिक हानी संभवते. सप्ताह चांगला जाईल .

कर्क

राशी स्वामी चंद्र पूर्वार्धात अशुभ अवस्थेत असणार आहे. क्लेश दायक आहे. मानसिक ताण ,प्रकृतीचे त्रास संभवतात. नातेवाईक भेट होईल. वेळ फुकट जाईल. आता शनि महाराज अष्टमात गेले आहेत.जपून रहा. कोणालाही कर्ज देणे, घेणे टाळा. प्रवास जपून करा.अतिरेकी धाडस नको. पैशाचा अपव्यय टाळा. सध्या गुरू बळ उत्तम आहे. त्यामुळे सप्ताह उत्तम पार पडेल. अमावस्येच्या आसपास शनीची उपासना सुरू ठेवा. प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य जपा. सप्ताह मध्यम.

सिंह

राशीस्वामी रवि मेष राशीत असून अध्यात्म विद्येशी संपर्क आणेल. वैवाहिक जीवनात धोक्या पासून सावध राहा. काही उष्णतेचे विकार त्रास देतील. गुरूबळ नसल्याने सावध राहून कार्य करा. लौकरच दिवस बदलणार आहेत. अष्टम स्थ ग्रह व्यावसायिक ताण निर्माण करतील. मात्र काही संधी देतील. काळजीपूर्वक पुढे जा. गृह वाहन याबाबत लाभ संभावतों. चंद्र कार्यक्षेत्रात ,वैवाहिक जीवनात फळ देणार आहे . सप्ताह मध्यम.

कन्या

राशी स्वामी बुध ग्रह अश्टम स्थानात आहे. आरोग्य दृष्ट्या मध्यम काळ. भाग्य शुक्र घरात अनेक सुधारणा, नवीन वस्तूंची खरेदी होईल. षष्ठ स्थानातील ग्रह शत्रू, आरोग्य समस्या निर्माण करतील. शत्रूपासून सावध राहा असा इशारा देत आहेत. काही जुनी दुखणी डोकं वर काढतील. वेळीच उपचार करा. अष्टमातील राहू रवि स्त्री रोग कारक आहे .काळजी घ्या. सप्ताहाचा पूर्वार्ध मध्यम आहे. अमावास्या आर्थिक आणि शारीरिक चिंतेची. सप्ताह मध्यम.

तुला

राशी स्वामी शुक्र अष्टमात असून सामाजिक आणि कौटुंबिक बाबी संबंधी फळ देईल. पंचम स्थानात ग्रह योग उच्च शिक्षणाचे योग येतील. षष्ठ गुरू आणि मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. काहीसे नकारात्मक वातावरण राहिलं. उत्तरार्धात मात्र बदल होईल. पंचम स्थानातील चंद्र मन आणि आरोग्य दोन्ही मध्यम ठेवेल. सरकारी कामकाजात यश देईल .पितृ चिंता होईल. अमावास्या आणि एकूण सप्ताह मिश्र फळ देईल.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळाचे अष्टम स्थानात भ्रमण वैवाहिक जीवनात अस्थिरता दाखवत आहे. गैरसमज,कलह टाळा. व्यावसायिक जीवनात देखील घडामोडी होतील. पूर्वार्धात चतुर्थ शनि चंद्र मातृ पितृ चिंता निर्माण करेल. घरामध्ये मोठ्या घटना घडवून आणेल. आई वडिलांची काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल. शनी उपासना करावी . अमावास्या गृह चिंतेची. शत्रू पडून जपा. सप्ताह मध्यम जाईल.

धनू

राशी स्वामी गुरू रवि सोबत पंचम स्थानात येत आहे . संतती सौख्य आणि उच्च शिक्षण यासाठी उत्तम फळ देईल. मातृ सुख देईल .कार्यालयीन कामकाज करण्यात यश देईल. अचानक येणाऱ्या नवीन संधी जाऊ देऊ नका. मंगळ जोडीदाराचा स्वभाव तापट करेल. रक्त विकार त्रास देतील. सप्ताहाचा पूर्वार्ध जपून रहा. परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी वागताना काळजी घ्या. वैवाहिक जीवन सुखद राहील. अमावास्या काळात चंद्र उपासना करा. सप्ताह शुभ.

मकर

राशी स्वामी शनि स्वगृही असून आर्थिक ,कौटुंबिक घडामोडी होतील. तृतीय स्थानात गुरू भावंडांची भरभराट घडवेल. भावंडांच्या उत्कर्षा साठी अनुकूल काळ आहे. तसेच परदेश प्रवास घडतील. राहू मातृ सुखात कमी आणेल. स्थान बदल घडेल. कार्य क्षेत्रात जर काही बदल करायचे असतील तर हा अनुकूल काळ आहे . संतती चिंता वाटत असेल तर तिकडे लक्ष असू द्या. आरोग्य जपा. अमावास्या कौटुंबिक त्रासाची. सप्ताह बरा आहे

कुंभ

राशी स्वामी शनि स्वगृही चंद्रासह असून अचानक प्रवास, समारंभात सहभाग ,उत्तम खरेदी असे लाभ देईल.साडेसातीचा काळ असला तरी धन कारक गुरू आर्थिक आणि कौटुंबिक बाबीत लाभ देईल . प्रेरणादायी विचार येतील . बोलण्याने लोकांना जिंकून घ्याल. पैतृक संपत्ती मिळेल.पंचम मंगळ संततीसाठी नवीन खरेदी घडवतील. सजावट कराल. किंवा नवीन प्रॉपर्टी चे योग येतील .सप्ताह आणि अमावास्या जपून राहण्याचे संकेत देत आहे. सप्ताह मध्यम जाईल.

मीन

राशी स्वामी गुरू स्वराशीत असून मान सन्मान , प्रगती आणि संपत्ती यात वाढ करेल. कुटुंबात वाढ,वैवाहिक जीवनाची सुरवात ,तसेच संतती प्राप्ती करता उत्तम काळ आहे.साडे सती असली तरी घाबरु नका.परदेश गमनाची संधी येईल .व्यय शनि आणि द्वितीय राहू घरा पासून दूर जाण्याचे योग आणतील. गृहकलह आणि भावंडाना कष्ट संभवतात. सप्ताहाच्या पूर्वार्धात काळजी घ्या. अमावास्या आर्थिक नुकसानीची. आरोग्याची काळजी घ्या.सप्ताह मध्यम.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?