AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diamond Astrology: या राशीच्या जातकांनी हिरा परिधान करणं टाळावं! ज्योतिषशास्त्र काय सांगते जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहासाठी खडा सांगितला गेला आहे. कुंडलीतील ग्रह कमकुवत असल्यास खडा वापरून त्या ग्रहाची स्थिती अनुकूल केली जाते. असंच काहीसं शुक्र ग्रहाबाबत आहे. यासाठी हिरा सूचवला जातो, पण त्यासाठी काही नियम आहेत.

Diamond Astrology: या राशीच्या जातकांनी हिरा परिधान करणं टाळावं! ज्योतिषशास्त्र काय सांगते जाणून घ्या
Diamond Astrology: या राशीच्या जातकांनी हिरा परिधान करणं टाळावं! ज्योतिषशास्त्र काय सांगते जाणून घ्याImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 11, 2026 | 9:56 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहासाठी हिरा हा खडा सूचवला जातो. शु्क्र हा ग्रह सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनातील अडचणीत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या ग्रहाची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. अशा स्थितीत अनेक हिरा परिधान करतात. पण अनेक जण फक्त शौक म्हणून हिरा परिधान करणं पसंत करतात. हिरा सर्वात मूल्यवान रत्न आहे. तसेच कठोर असतो आणि आकर्षक असल्याने अनेक जण परिधान करतात. ज्योतिषशास्त्रात हिरा हा एक महत्त्वाचा खडा आहे. कारण हा शुक्राशी निगडीत आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, हिरा असलेली अंगठी बोटात परिधान केली तर सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच त्याचा थेट प्रभाव वैवाहिक जीवनावर पडतो. पण तज्ज्ञांचा सल्ला न घेता थेट हिरा परिधान केला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतात. काही राशीच्या जातकांनी हिरा परिधान न केलेलाच बरा असतो. चला जाऊन घेऊयात त्या राशींबाबत

या राशीच्या जातकांनी हिरा परिधान करू नये

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष-सिंह-वृश्चिक-धनु-मीन राशीच्या जातकांनी हिरा परिधान करू नये. या राशींसाठी हिरा शुभ फळ देत नाही. तसेच ज्या लोकांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, अशा लोकांनी हिरा परिधान करणं टाळावं. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांनी हिरा परिधान करणं शुभ मानलं जातं. तर कर्क राशीच्या जातकांनाही हिरा परिधान केल्याने लाभ मिळतो. ग्लॅमर, फिल्म आणि मीडियातील लोकांसाठी हिरा लाभदायक मानला जातो.

हिरा परिधान करताना काळजी घ्यावी

तुमच्या राशीसाठी हिरा लाभदायी असला तरी कुंडलीतील ग्रहमान पाहूनच निर्णय घ्यावा, असं ज्योतिष सांगतात. ज्योतिषीय सल्ला न घेता फक्त फॅशन किंवा दिखावा करण्यासाठी हिरा परिधान करू नका. मधुमेह आणि रक्ताशी निगडीत समस्या असलेल्यांनी हिरा अजिबात घालू नये. हिरा परिधान करण्यासाठी वयही सांगितलं गेलं आहे. हिरा 21 वर्षानंतर आणि 50 वर्षांच्या दरम्यान घालवा. हे वय हिरा घालण्यासाठी योग्य मानलं गेलं आहे. वैवाहिक आयुष्यात अडचणी असतील तर हिरा अजिबात घालू नका. हिऱ्याला तडा गेला असल्यास अजिबात घालू नका. त्यामुळे अपयश किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा