AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: मयंक यादवकडून फक्त 6 सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी, पहिल्या चेंडूवरच रेकॉर्डची नोंद

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत मयंक यादवच्या गोलंदाजीला पुन्हा एकदा धार चढल्याचं दिसत आहे. जवळपास दोन वर्षांनी त्याने टीम इंडियात यशस्वी कमबॅक केलं आहे. त्याने झिम्बाब्वेच्या सलामीवीराला तग धरूच दिला नाही.

IND vs ZIM: मयंक यादवकडून फक्त 6 सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी, पहिल्या चेंडूवरच रेकॉर्डची नोंद
IND vs ZIM: मयंक यादवकडून फक्त 6 सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी, पहिल्या चेंडूवरच रेकॉर्डची नोंदImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 26, 2026 | 7:32 PM
Share

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशी आणि इशान किशनने फलंदाजीत चांगली कामगिरी बजावली. दुसरीकडे, भारताचा युवा गोलंदाज मयंक यादवची चमकही या मालिकेत दिसून आली आहे. जवळपास पावणे दोन वर्षे दुखापतीमुळे मयंक यादव मैदानापासून दूर होता. मात्र त्याने टीम इंडियात कमबॅक केलं आणि आपली छाप सोडली आहे. त्याने आपल्या वेगाने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. या मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दोन सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. दोन्ही वेळेस त्याने पहिल्या चेंडूवर ओपनर ब्रायन बेनेट याला तंबूचा रस्ता दाखवला. यासह मयंक यादवने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.

मयंक यादवचा पहिल्या चेंडूवर कारनामा

भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ब्रायन बेनेट आणि बेन करन ही जोडी मैदानात उतरली होती. स्ट्राईकला ब्रायन बेनेट होता आणि चेंडू मयंक यादवच्या हातात होता. त्याने पहिला चेंडू जवळपास 147 किमी प्रतितास वेगाने टाकला. अचूक टप्प्याचा मारा असल्याने चांगल्या गतीमुळे चेंडूला उसळी मिळाली. हा चेंडू खेळताना ब्रायन फसला आणि कट लागून थेट वैभव सूर्यवंशीच्या हातात गेला. वैभव सूर्यवंशीने कोणतीही चूक न करता झेल पकडला. या मालिकेत मयंकने दुसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट काढली.

मयंक यादवने रचला विक्रम

मयंक यादवने फक्त 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. टी20 क्रिकेटमध्ये मयंक यादवने तिसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. यासह त्याने भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोघांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा कारनामा तीन वेळा केला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. मयंक यादवने पुढच्या टी20 मालिकेत पहिल्या चेंडूवर विकेट काढली तर या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान होईल.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...