मुलींसाठी रोल मॉडेल आहे ही महिला IAS, गगनभरारी घेण्याची जिद्द असेलतर काहीच आड येऊ शकत नाही

| Updated on: Jan 03, 2021 | 4:41 PM

आपणं ठरवले तर जगात काहीही अशक्य असे नाही. फक्त त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची इच्छा असल्यास, कोणीही यश मिळवण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही.

मुलींसाठी रोल मॉडेल आहे ही महिला IAS, गगनभरारी घेण्याची जिद्द असेलतर काहीच आड येऊ शकत नाही
Follow us on

दिल्ली : आपणं ठरवले तर जगात काहीही अशक्य असे नाही. फक्त त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची इच्छा असल्यास, कोणीही यश मिळवण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही. एक महिला आयएएस मुलींसाठी एक उदाहरण बनल्या आहेत. कारण, त्यांचे आयुष्य इतर सामान्य लोकांसारखे नव्हते. लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या होत्या. परंतू त्या परिस्थितीवर रडत न बसता त्यावर मात करून त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले. ज्याची आपण कल्पनाही आपण करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला आयएएस आरती डोगरा (Aarti Dogra) यांच्याबद्दल सांगणार आहोत. (Do you know the story of IAS officer Aarti Dogra?)

आरती डोगरा (Aarti Dogra) मूळच्या उत्तराखंडच्या दूनमधील विजय कॉलनीच्या रहिवाशी आहेत. बालपणापासूनच त्यांच्या वाट्याला संघर्ष आला करत होता. कारण त्याची उंची फक्त 3 फूट 2 इंच आहे. लहाणपणीच डॉक्टर म्हणाले की, ती सामान्य शाळेत शिकू शकणार नाही. आरतीचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा सैन्यात अधिकारी आणि आई कुमकुम शाळेत प्राचार्य होते. मात्र, मुलीची उंची कमी असली तरी त्यांनी हार न मानता तिला प्रोत्साहन देत तिला सामान्य शाळेतच शिकायला पाठवले. तसेच क्रीडा व इतर स्पर्धांमध्येही त्या सहभाग घेत होत्या.

शाळा सोडल्यानंतर आरती डोगरा दिल्ली येथील विद्यापीठाच्या लेडीज श्री राम कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आल्या. येथे त्यांनी विद्यार्थी राजकारणातही भाग घेतला आणि विद्यार्थी संघाच्या निवडणुकाही जिंकल्या. पदवीनंतर त्यांनी देहरादून येथून पीजीचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी देहरादूनच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा यांची भेट घेतली आणि तेथून त्याचे आयुष्य बदलत गेले.

आरती डोगरा सांगतात की, मनीषा यांनीच त्यांना जिल्हाधिकारी होण्यासाठी प्रेरित केले आणि त्यानंतरच आरती यांनी ठरवले की जिल्हाधिकारी होण्याचे आरती यांचे वडिलही या निर्णयामध्ये त्यांच्यासोबत होते. त्यांनी लेखी परीक्षा दिली त्याचा निकाल अतिशय चांगला आला. त्याचनंतर जेव्हा त्यांनी मुलाखत दिली तेंव्हा त्या चिंताग्रस्त होत्या. मात्र, मुलाखतही खूप चांगली गेली आणि त्या पहिल्याच प्रयत्नात कलेक्टर झाल्या.

आरती डोगरा ह्या 2006 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. राजस्थानमधील वेगवेगळ्या भागात त्या कलेक्टर असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेते आहेत. परंतु, आरती डोगरा यांनी हे विधान खरे करून दाखवले की, जर तुम्ही जिद्दीने एखादी गोष्ट कारायचे ठरवाता आणि त्यासाठी मेहनत, कष्ट घेण्याची तुमची पूर्ण तयारी असेत तर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही.

Do you know the story of IAS officer Aarti Dogra?)