ग्रुप सेक्स की एकास एक? पॉवरफुल अध्यक्षाचं पॉवरफूल कमेंट, वाचा ब्लादिमीर पुतीन यांची चॉईस

ब्लादिमीर पुतीन यांना सेक्सलाईफबद्दल एकदा विचारलं गेलं की वन ऑन वन म्हणजे एकास एक जोडीदाराच सेक्स आवडतो की ग्रुप सेक्स? त्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं होतं. ( Russian President Vladimir Putin powerful answer on the question of group sex  )

ग्रुप सेक्स की एकास एक? पॉवरफुल अध्यक्षाचं पॉवरफूल कमेंट, वाचा ब्लादिमीर पुतीन यांची चॉईस
ब्लादिमीर पुतीन

नवी दिल्ली:  रशिया हा बंदिस्त भींतींचा देश म्हणून ओळखला जातो. जसं चीनमधून सहसा काही बाहेर पडत नाही तशीच थोड्याफार प्रमाणात रशियन व्यवस्था आहे. तिथलं सामाजिक, राजकिय जीवन वेगवेगळ्या कारणाने ढवळत असतं. वेगवेगळ्या देशात रशियन महिला वेश्याव्यवसायात दिसतात. अशाच एका पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना प्रश्न केला गेला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अचंबित करणारं आहे. ( Russian President Vladimir Putin powerful answer on the question of group sex  )

वन ऑन वन की ग्रुप सेक्स?

ब्लादिमीर पुतीन यांच्या सेक्सलाईफबद्दल अनेक वेळा चर्चा झाल्यात. काही वावटळीही उठल्यात. पण 2012 साली त्यांना एकदा विचारलं गेलं की वन ऑन वन म्हणजे एकास एक जोडीदाराच सेक्स आवडतो की ग्रुप सेक्स? त्यावर पुतीन क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ग्रुप सेक्स. प्रश्न विचारणारा तर अचंबित झालाच पण टीव्हीवर मुलाखत पहाणाऱ्यांनाही धक्का बसला. नेहमीच्या मिश्किलपणाने पुतीन यांनी पुढं स्पष्टीकरण देत बोलले, कारण ग्रुप सेक्समध्ये सहभागी पार्टनर हे ब्रेक घेऊ शकतात.

पामेला अँडरसन आणि पुतीन एकत्र?

ब्लादिमीर पुतीन सत्तरीत आहेत. पण ते फिट आहेत. अजूनही अधूनमधून फिटनेस दाखवण्यासाठी ते बर्फावर हॉकी खेळतात. ज्युडोच्या स्पर्धेत भाग घेतात. मायन डिग्री तापमानात बर्फाच्या पाण्यात अंघोळ करतात. एकदा प्लेबॉयमुळे फेमस झालेली अभिनेत्री पामेला  अँडरसनला विचारलं होतं, पुतीनला कधी डेट केलं आहे का म्हणून. त्यावेळेस ती काही सेकंद थांबली आणि हसत उत्तर दिलं. होय, अर्थात काही वेळेस आम्ही एका जागेत एकत्र आलेले होतोत. आणि माझे रशियासोबत खास संबंध आहेत. त्यावेळेस पामेला आणि पुतीनच्या संबंधांची जगभर चर्चा झाली.

मर्डॉकच्या बायकोसोबतही पुतीनचे संबंध?

मीडिया मुघल म्हणून ओळख असलेल्या रुपर्ट मर्डॉक यांच्या पत्नीसोबतही पुतीनचे संबंध होते का याचीही अनेक वेळेस चर्चा झाली आहे. दोघेही आता घटस्फोटीत आहेत.  त्याला कारण स्वत: वेंडी डेंगच्या डायरीतली काही पानं आहेत जी लिक झाली होती. त्यात वेंडी डेंग म्हणते,तो खूप चार्मिंग आहे. त्याचे कपडे खुप छान आहेत. त्याची बॉडी, खास करुन पाय आणि बट एकदम भारी आहे. तो उंचपुरा आहे, डोळे निळे आहेत ज्याच्या मी प्रेमात आहे आणि मला त्याची पावरही खूप आवडते.  वेंडी डेंगची डायरीतलं हे वर्णनं काही वर्षापुर्वी लिक झालं होतं. हे नेमकं कुण्या पुरुषाचं वर्णन आहे याचा कयास बांधला तर पुतीनशिवाय दुसरं नाव समोर येत नाही. त्यामुळेच जगातल्या माध्यम सम्राटाची बायकोही मोस्ट पॉवरफुल व्यक्तीसोबत संबंधात होती अशी चर्चा रंगली.

सेम सेक्स मॅरेजला पुतीनचा विरोध?

सम लैंगिक विवाहांबद्दल जगभर चर्चा घडती आहे. काही देशात त्याला मान्यता मिळालीय तर काही देशात अजूनही त्याला विरोध आहे. पोपपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाचं याबाबत मत आहे. पुतीन यांनाही हा प्रश्न अनेक वेळा सतावला आहे. कारण रशियात सामाजित अभिसरणात सेम सेक्स मॅरेजची मागणी जोर धरू लागली आहे. पण एकदा नाही तर ज्यावेळेसही पुतीन यांना हा प्रश्न विचारला गेला आहे, त्यावेळेस त्यांनी जोपर्यंत मी रशियाच्या अध्यक्षपदावर आरुढ आहे तोपर्यंत तर रशियात समलैंगिक विवाह होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ग्रुप सेक्सला पसंती देणारे पुतीन, सेम सेक्स मॅरेजच्या मात्र विरोधात आहेत.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर(Opens in a new browser tab)

JOBS | ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया!(Opens in a new browser tab)

( Russian President Vladimir Putin powerful answer on the question of group sex  )