AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | मुंबईकरांना भुरळ पाडणारा प्रसिद्ध ‘काळा घोडा फेस्टिव्हल’, वाचा याचा इतिहास…

मुंबईकर ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Special Story | मुंबईकरांना भुरळ पाडणारा प्रसिद्ध ‘काळा घोडा फेस्टिव्हल’, वाचा याचा इतिहास...
यंदा हा फेस्टिव्हल 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021पर्यंत आयोजित केला जाणार आहे.
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 06, 2021 | 1:03 AM
Share

मुंबई : मुंबईकर ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 6 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलचे यंदाचे 22वे वर्ष आहे. मुंबईत दरवर्षी होणारा हा काळा घोडा कला महोत्सव यावर्षी मात्र व्हर्चुअल असणार आहे (Virtual Kala Ghoda Festival 2021).

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. अशातच आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. तब्बल 8 ते 10 महिने घरात अडकून पडलेले लोक बाहेर पडू लागले आहेत. दरम्यान काही गोष्टी पुन्हा एकदा पूर्वमार्गावर येत आहेत. म्हणूनच यंदाही ‘काळा घोडा महोत्सवा’ची यशस्वी घौडदौड सुरूच राहणार आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग आणि लोकांच्या आरोग्याच्या विचार करून यंदाचा हा महोत्सव ‘डिजिटल’ अर्थात ‘व्हर्चुअली’ आयोजित करण्यात येणार आहे.

काय आहे ‘काळा घोडा फेस्टिव्हल’?

मुंबईत आयोजित होणारा काळाघोडा फेस्टिव्हल हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे ज्यामध्ये कलेशी जोडले गेलेले लोक, कलेचे जपणूक करणारे लोक आणि कलेत रस असणारे सामान्य नागरिक सामील होतात. हा उत्सव भारतातील सर्वात प्रसिद्ध महोत्सवांपैकी एक आहे. यंदा हा फेस्टिव्हल 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021पर्यंत आयोजित केला जाणार आहे. यावर्षी काळा घोडा कला महोत्सव ऑनलाईन होणार असला तरी नेहमीप्रमाणेच बर्‍याच रोमांचक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाचे आयोजन नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन काळा घोडा असोसिएशन (केजीए) करणार आहे आणि हा महोत्सव इनसाइडर होस्ट करणार आहे (Virtual Kala Ghoda Festival 2021).

का प्रसिद्ध आहे ‘हा’ महोत्सव?

फेस्टिव्हलच्या वेळापत्रकात नृत्य आणि संगीत, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि याविषयी चर्चा समाविष्ट आहे. महोत्सवात सहभागी होणारा प्रत्येकजण कला, संगीत, नृत्य, साहित्य, नाट्यगृह आणि पुस्तक लॉन्च यासारख्या सर्व गोष्टी ऑनलाईन पाहण्यास सक्षम असतील. हा महोत्सव मुंबईतील कलात्मक वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे व्यासपीठ ठरणार आहे. यावेळी ‘काळा घोडा फेस्टिव्हल 2021’मध्ये सुमारे 70 कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कारागीर आणि हस्तकला प्रेमींसाठीचे स्टॉल्स 6 फेब्रुवारीपासून त्यांचे उत्पादन ऑनलाईन प्रदर्शित करतील. तसेच, इच्छुक खरेदीदार अधिकृत वेबसाईटवर या वास्तू खरेदी करू शकतात.

कधी झाली या महोत्सवाची सुरुवात?

या फेस्टिव्हलची सुरुवात 1999मध्ये करण्यात आली. हा फेस्टिव्हल मुंबईच्या काळा घोडा परिसरातील स्ट्रीटवर गेले 21 वर्ष भरवण्यात येत आहे. काळ्या घोड्यास इंग्रजीत ‘ब्लॅक हॉर्स’ म्हणतात, ज्यामध्ये राजा एडवर्ड सातवा (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स) यांच्या काळात या पाषाणाच्या पुतळ्याचा संदर्भ देण्यात आला होता. हा घोडेस्वारी करणारा पुतळा मुंबईच्या या भागात बसवण्यात आला होता. तथापि, हा पुतळा 1965 मध्ये भायखळा येथून जुहूला पाठवला गेला. देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महोत्सवात देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात, तर नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत, विविध राज्यातील स्टॉल, मुलांसाठी वेगळे सेक्शन, इनोव्हेटिव इंस्टॉलेशन सर्व पाहायला मिळते.

(Virtual Kala Ghoda Festival 2021)

हेही वाचा :

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ