AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha : पितृपक्षात महिलांनी ‘या’ 6 गोष्टी टाळाव्यात; पितरांच्या नाराजीबाबत काय सांगतात धार्मिक परंपरा? जाणून घ्या…

पितृपक्षाच्या काळात श्राद्ध, तर्पण आणि पूर्वजांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. या काळात काही धार्मिक मान्यतांनुसार महिलांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले जाते. काही गोष्टी करणे महिलांनी आवर्जुन टाळले पाहिजेत, नाहीतर काहीतरी पित्र नाराज होण्याची शक्यता असते.

Pitru Paksha : पितृपक्षात महिलांनी ‘या’ 6 गोष्टी टाळाव्यात; पितरांच्या नाराजीबाबत काय सांगतात धार्मिक परंपरा? जाणून घ्या...
pitrupakshImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2026 | 7:27 PM
Share

गणपतीनंतर पितृपक्षाला सुरूवात होते.या काळात आपल्या पुर्वजांचे स्मरण केले जाते. आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी घराघरात पूजा विधी केली जाते. शेजारी पाजारच्या लोकांना, नातेवाईकांना म्हाळाच्या जेवणाचे निमंत्रण दिले जाते. यंदा पितृपक्ष 27 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 10 ऑक्टोबरला सर्वपितृ अमावस्या आहे. पण काही पूजा विधी करताना महिलांनी काही गोष्टिंकडे लक्ष देणे विशेष महत्त्वाचे आहे. ज्यामुळे घरात नकारात्मकता येत नाही आणि आपल्यावर पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहतो. त्यामुळे या काही गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत.

दक्षिण दिशेला दिवा लावण्याची मान्यता

पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेकडे दिवा लावण्याची परंपरा आहे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. तसेच प्लॅटमध्ये राहणारे लोक घराच्या बाल्कनीत दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू शकतात.

श्राद्धाचे भोजन कोण बनवणार

धार्मिक मान्यतेनुसार मासिक पाळीच्या काळात माहिलांनी श्राद्ध किंवा तर्पणासाठीचे भोजन बनवू नये असे सांगितले जात. अशा वेळी घरातील दुसऱ्या महिलांनी किंवा पुरूषही जेवण बनवू शकतो.परंतु काही चालिरितींमध्ये या नियमांत तफावत असू शकते.

संध्याकाळी झाडू मारू नये

पितृपक्षात संध्याकाळच्या घरात झाडू मारणे किंवा साफसफाई करणे टाळावे अशी धार्मिक मान्यता आहे. श्राद्धाशी संबंधित कर्मांमध्ये घरातील शुद्धता आणि पवित्रतेला महत्त्व दिले जाते.

जेवणातील काही भागात ठेवण्याची परंपरा

पितृपक्षात रोज स्वयंपाक करताना जेवणाचा एक भाग आधीच वेगळा काढून ठेवण्याची परंपरा सांगितली जाते. हा भाग पितरांच्या नावाने गायीला खावू घालण्याची पद्धत आहे.

पितरांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याची मान्यता

ज्या दिवशी पितरांची श्रद्धा आहे, त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवावेत, यामागे पूर्वजांचे प्रेम, आठवण आणि आदर व्यक्त करण्याची भावना असते असे सांगितले जाते.

घरात वाद टाळण्याचा सल्ला

पितृपक्षाच्या काळात घरातील वातावरण शांत ठेवण्यावरही भर दिला जातो. महिलांनी विनाकारण वाद – विवाद टाळावा आणि कुटुबांतील सदस्यांशी प्रेमाने वागावे.

वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात