वर्षातून फक्त एकदाच उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे! सहा मुखांच्या भगवान कार्तिकेयांचे मंदिर आहे तरी कुठे?

आपल्या देशात असे की मंदिर आहे ज्याचे दरवाजे फक्त वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उघडतात. तिथे मुखांच्या भगवान कार्तिकेयांची पूजा केली जाते.

वर्षातून फक्त एकदाच उघडतात या मंदिराचे दरवाजे! सहा मुखांच्या भगवान कार्तिकेयांचे मंदिर आहे तरी कुठे?
social media
| Updated on: Nov 21, 2026 | 3:18 PM

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे असलेले भगवान कार्तिकेयांचे एक प्राचीन मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तब्बल 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षभर भाविकांना दर्शन घेता येत नाही. मंदिराचे दरवाजे वर्षातून केवळ एकदाच, म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात. त्यामुळे या खास दिवशी भगवान कार्तिकेयांचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक ग्वाल्हेरमध्ये दाखल होतात.

कार्तिक पौर्णिमेला उसळतो भक्तांचा जनसागर!

कार्तिक पौर्णिमा हा दिवस या मंदिरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान कार्तिकेयांचे सहा मुखांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मनोभावे कार्तिकेयांचे दर्शन घेतल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्यावर वर्षभर देवाची कृपा राहते. या विशेष दिवसासाठी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. भगवान कार्तिकेयांचा विशेष अभिषेक, पूजाविधी आणि शृंगार केला जातो. मंदिराच्या परिसरात यात्रेचे स्वरूपही पाहायला मिळते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला ग्वाल्हेरमधील या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते.

Loading...

सहा पिढ्यांपासून सुरू आहे देवसेवेची परंपरा!

या मंदिराची आणखी एक खास बाब म्हणजे येथील पूजाअर्चेची परंपरा. मंदिरातील पुजाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब गेल्या सहा पिढ्यांपासून भगवान कार्तिकेयांची सेवा करत आहे. वर्षातून एकदाच मंदिराचे दरवाजे उघडत असल्याने या दर्शनाला भाविकांच्या मनात विशेष स्थान आहे.

मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेलाच का उघडतात?

मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेलाच का उघडले जातात, यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांनी आपल्या दोन्ही पुत्रांची, म्हणजेच गणेश आणि कार्तिकेय यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. जो संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून सर्वप्रथम परत येईल, त्याचा विवाह आधी लावून दिला जाईल, अशी अट ठेवण्यात आली. ही अट ऐकताच भगवान कार्तिकेय आपल्या मोरावर स्वार होऊन ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेसाठी निघाले. मात्र, भगवान गणेश यांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर केला. त्यांनी आई-वडिलांनाच संपूर्ण विश्व मानून त्यांची प्रदक्षिणा घातली. त्यामुळे गणेशजी सर्वप्रथम परतल्याचे मानले गेले आणि त्यांचा विवाह रिद्धी-सिद्धी यांच्याशी झाला.

काही काळानंतर कार्तिकेय परतले, तेव्हा त्यांना आपल्या धाकट्या भावाचा विवाह झाल्याचे समजले. यामुळे ते नाराज झाले आणि सर्वांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माता पार्वतीसह कोणालाही भेटण्यास नकार दिला. मुलाच्या या निर्णयामुळे माता पार्वती व्यथित झाल्या. त्यांनी भगवान शिव यांच्याकडे कार्तिकेयांना भेटण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान शिव यांनी कार्तिकेयांना वरदान दिले की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जे भक्त त्यांचे दर्शन घेतील, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील.

अशी धार्मिक मान्यता असल्यामुळेच ग्वाल्हेरमधील या प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षातून केवळ कार्तिक पौर्णिमेलाच उघडले जातात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us