ज्यांना मुलगा आहे अशा पुरुषांनी कधीही करू नयेत या 5 चुका; अन्यथा पश्चाताप होईल, चाणाक्य म्हणतात…
आचार्य चाणक्य यांच्या चाणाक्यनितीनुसार खूप गोष्टी आपल्या आयुष्यात उपयोगी पडत असतात. त्यांनी प्रत्येक गोष्टींसाठी काहीनाही कीही सुचना, संदेश देऊन ठेवले आहेत जेणेकरून आपल्याला चूक-बरोबर याची समज येईलय.यातील एक म्हणजे ज्यांना मुलगा आहे अशा पुरुषांनी त्यांच्या मुलाबाबत कोणत्या चुका करणे टाळावे जेणेकरून भविष्यात त्यांना पश्चाताप करण्याची आवश्यकता भासणार नाही.

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान शिक्षक, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि राजनयिक होते. प्रेरणा, जीवन व्यवस्थापन, नेतृत्व, नातेसंबंध पालकत्व यासारख्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची धोरणे अजूनही लोकांसाठी खूप उपयुक्त मानली जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये पालकत्वाशी संबंधित देखील अनेक सूचना देखील दिल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे आचार्य चाणक्य यांनी ज्यांना अपत्ये मुलगा आहे अशा पुरुषांनी कोणत्या चुका करू नये याबद्दल सांगितलं आहे. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
चाणाक्य नीतिमध्ये चाणाक्यांनी मुलाच्या वडिलांसाठी काही सुचना दिल्या आहेत. चला जाणून घेऊयात की आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्या चुका आहेत ज्या मुलाच्या वडिलांनी करू नयेत
जास्त लाड करणे टाळा
चाणक्य नीतिनुसार, वडिलांनी आपल्या मुलाचे जास्त लाड करू नये. असे केल्याने मुलगा हट्टी आणि बेजबाबदार बनू शकतो. मुलाला यश आणि शिस्तीची जाणीव होण्यासाठी कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व समजावून सांगणे म्हत्वाचे आहे.
तुमच्या मुलाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू नका.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करणे टाळा. उलट, तुमच्या मुलाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जर तुम्ही वडील म्हणून तुमच्या मुलासाठी सर्व निर्णय घेतले तर भविष्यात तुमचा मुलगा स्वतःहून कोणताही निर्णय घेण्यास घाबरेल. तसेच जर त्याचे निर्णय चुकले तर त्याला ती शिकवण मिळेल आणि बरोबर आले तर आत्मविश्वास.
चांगले संस्कार न देणे
बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना वाढवताना पैशाचे महत्त्व शिकवतात पण त्यांच्यात चांगले संस्कार रुजवण्यात अपयशी ठरतात. अशी मुले मोठी होऊन लोभी आणि स्वार्थी बनू शकतात.
मुलाला भोळे किंवा बेजबाबदार समजणे
काही वडील आपल्या मुलाला कमकुवत आणि बेजबाबदार मानतात आणि त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत. असे केल्याने मुलगा निराश होतो आणि स्वतःला कमकुवत समजू लागतो. ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास डगमगू शकतो.
सतत मुलाच्या गुणांची स्तुती करणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमचा मुलगा प्रतिभावान आणि महान असेल, तर तुम्हाला त्याची प्रशंसा करण्याची आणि त्याने आयुष्यात काय कामगिरी केली आहे हे सर्वांना सांगण्याची गरज नाही. त्याचे गुण आणि कर्तव्ये त्याला समाजात ओळख मिळवून देतील. सर्वांसमोर तुमच्या मुलाची प्रशंसा केल्याने त्याच्या मित्रांमध्ये मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. याचा मित्रांसोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
