AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक देवी देवतांना आवडते विशेष फुल, पुजेत अशा प्रकारे करा फुलांचा समावेश

देवाला फुले (Flowers and God) अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही. तसे, आपण कोणत्याही देवाला कोणतेही फूल अर्पण करू शकता. पण जर..

प्रत्येक देवी देवतांना आवडते विशेष फुल, पुजेत अशा प्रकारे करा फुलांचा समावेश
कोणत्या देवाला कोणते फुलं वाहावे?Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 10, 2023 | 6:09 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा करतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळी फुले अर्पण केली जातात. देवाला फुले (Flowers and God) अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही. तसे, आपण कोणत्याही देवाला कोणतेही फूल अर्पण करू शकता. पण जर त्याच्या आवडीची फुले त्या देवाला अर्पण केली तर साधकाची त्या पुजेची फलप्राप्ती होते.  दिव्य मस्तक कुर्यात्कुसुमोफितं सदा । म्हणजेच देवतेचे मस्तक नेहमी फुलांनी सजवावे असे फुलांच्या संदर्भात शारदा  तिलक या ग्रंथात म्हटले आहे.

भगवान श्री गणेश

श्रीगणेशाला तुळशी सोडून सर्व प्रकारची फुले अर्पण करावीत असे शास्त्रात वर्णन आहे. पद्मपुराण आचाररत्नात असेही लिहिले आहे की ‘न तुलस्य गणाधिपम’ म्हणजे तुळशीने कधीही गणेशाची पूजा करू नका. गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. गणेशजींना दुर्वा अतिशय प्रिय आहे. दुर्वाच्या वरच्या भागावर तीन-पाच पाने असतील तर खूप चांगले.

भगवान शिव

भगवान शंकराला धतुरा, हरसिंगार, नागकेसर, वाळलेल्या कमलगट्टा, कणेर, कुसुम, आक, कुश आदींची पांढरी फुले अर्पण केली जातात. शिवाला केवड्याचे फूल अर्पण केले जात नाही.

भगवान विष्णू

कमल, मौलसिरी, जुही, कदंब, केवडा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चंपा, वैजयंती ही फुले त्यांना विशेष प्रिय आहेत. तुळशीची डहाळ अर्पण केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यात केतकीच्या फुलांनी पूजा केल्याने भगवान नारायण विशेष प्रसन्न होतात. परंतु आक, धतुरा, शिरीष, सहजन, सेमल, कचनार व गुलार वगैरे विष्णुजींना अर्पण करू नये.

सूर्य नारायण

कुटजाच्या फुलांनी त्यांची पूजा केली जाते. याशिवाय कणेर, कमल, चंपा, पलाश, झळक, अशोक आदींची फुलेही त्यांना प्रिय आहेत.

भगवान श्रीकृष्ण

महाभारतात युधिष्ठिराला आपल्या आवडत्या फुलांचा उल्लेख करताना श्रीकृष्ण म्हणतात – मला कुमुद, कारवरी, चणक, मालती, पलाश आणि वनमाला ही फुले आवडतात.

भगवती गौरी

भगवान शंकराला अर्पण केलेली फुले माता भगवतीलाही प्रिय आहेत. याशिवाय बेला, पांढरे कमळ, पळस, चंपा यांची फुलेही अर्पण करता येतात.

माता लक्ष्मी

कमळ हे माता लक्ष्मीचे सर्वात आवडते फूल आहे. पिवळे फुले अर्पण करूनही तीला प्रसन्न करता येते. तीला लाल गुलाबाचं फूलही खूप आवडतं.

हनुमान

हनुमानाला लाल फुले प्रिय आहे.  त्यांना लाल गुलाब, लाल झेंडू इत्यादी फुले अर्पण करू शकतात.

देवी

कोणत्याही देवीला लाल जास्वंदाचे फूल खूप आवडते. असे मानले जाते की तिला 108 लाल जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!