सावधान! सूर्यग्रहण दरम्यान नासाकडून थेट मोठा इशारा, सूर्यग्रहणात मोबाईलवरून चुकूनही..
Solar Eclipse : 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातील हे पहिलेच सूर्यग्रहण आहे. काही मिनिटे पूर्णपणे अंधार दिवसा होणार आहे. सूर्यग्रहण बघण्यासाठी लोकांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. आता नुकताच या सूर्यग्रहणबद्दल नासाने थेट मोठा इशारा दिलाय.

यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. हे सूर्यग्रहण अमावस्याच्या दिवशी असेल आणि तब्बल 5 तास 25 मिनिटे हे ग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये उत्साह हा बघायला मिळतोय. सोशल मीडियावरही या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. 8 एप्रिल 2024 रोजी पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. या सूर्यग्रहणात काही वेळ दिवसा पूर्णपणे काळोखा देखील होणार आहे. यामुळे खबरदारी घेतली जातंय. हा दिवस खरोखरच खूप जास्त मोठा आहे. सूर्यग्रहणात हे करावे ते करू नये, असे नेहमीच सांगण्यात येते.
आता सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर थेट नासाकडून लोकांना मोठी वॉर्निंग देण्यात आलीये. विशेष म्हणजे ही वॉर्निंग मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आहे. आपण नेहमीच ऐकतो की, सूर्यग्रहण कधीच थेट डोळ्यांनी बघितले नाही पाहिजे. यामुळे डोळ्यांचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. आता थेट नासानेच मोठा इशारा दिला आहे.
I cannot for the life of me find a definitive answer to whether or not pointing a smartphone at the solar eclipse will fry the sensor
Tempted to just take a phone I don’t need and point it at the sun for 5 minutes to find out the real answer myself. In the name of science
— Marques Brownlee (@MKBHD) April 4, 2024
अनेकजण ग्रहणाच्या काळात मोबाईलवरून विविध फोटो व्हिडीओ काढतात. मात्र, आता याचबद्दलचा इशारा नासाकडून देण्यात आलाय. जर तुम्ही सूर्यग्रहणाचे फोटो किंवा व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्याने काढत असाल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. हो तुम्ही खरे ऐकले. तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो.
एका पोस्टवर कमेंट करत नासाने लिहिले की, जर तुम्ही सूर्यग्रहणाचा फोटो मोबाईलने घेत असाल तर तुमच्या कॅमेऱ्याचे सेंसर खराब होऊ शकतो. म्हणजेच काय तर सूर्यग्रहणाचे फोटो मोबाईलमध्ये काढणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. यासोबतच सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतात.
8 एप्रिल 2024 ला उत्तर अमेरिकेमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. हेच नाही तर दिवसा काही मिनिटे पूर्णपणे अंधार होणार आहे. यामुळेच खबरदारी म्हणून अनेक भागातील शाळांना सुट्टी दिल्याचे देखील समजते. आता उत्तर अमेरिकेतील या सूर्यग्रहणाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.