Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या वाईट सवयींपासून दूरच राहा

| Updated on: Apr 20, 2022 | 7:55 AM

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतीशास्त्राचे जाणकार होते. त्यांची धोरणे व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्ग दावतात. आचार्य चाणक्य यांची गणना उत्तम विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जातात.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या वाईट सवयींपासून दूरच राहा
chanakya niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतीशास्त्राचे जाणकार होते. त्यांची धोरणे व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्ग दावतात. आचार्य चाणक्य यांची गणना उत्तम विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जातात. चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले पण इतरांना या गोष्टींना सामोरे जावे लागू नये म्हणून त्यांनी चाणक्या नीती (Chanakya niti) या ग्रंथाची निर्मीती केली. चाणक्य यांनी आपल्या एका श्लोकात सांगितले की व्यक्तीच्या सवयीमुळे देवी लक्ष्मीची कृपा त्याच्यावर होत नाही. तसेच, असे लोक आर्थिक(Money) लाभापासूनही दूर राहातात. आचार्य चाणक्य म्हणतात, जे लोक आपल्या आसपास स्वच्छता ठेवत नाहीत आणि जे स्वच्छ नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नसते. एवढेच नव्हे तर अशा लोकांना समाजात मान-सन्मानही मिळत नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी स्वच्छ कपडे घाला.

  1. जे लोक त्यांच्या भूकेपेक्षा अधिक जेवण करतात ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत. कारण दारिद्र्य माणसाला गरीब बनवते. ते म्हणाले की जे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेतात ते निरोगी राहत नाहीत. त्यामुळे अशा लोकांचे जास्त पैसे हॉस्पिटल किंवा डॉक्टरच्या खर्चामध्ये जातात.
  2. ज्यांच्या बोलण्यात गोडवा नाही, जे कटू शब्द बोलतात, अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न नसते. जे लोक कटू शब्द बोलतात ते नेहमी स्वत:चे नुकसान करतात, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. जर आपण व्यापारी असाल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गोड बोलता आले पाहिजे, अन्यथा आपण कधीही धन लाभ घेऊ शकणार नाही. या व्यतिरिक्त आपण नोकरी करत असताना गोड बोलून इतरांची मने जिंकू शकता, आपल्या क्षेत्रातील प्रत्येकाशी सुसंवाद साधू शकता. समरसतेने कार्य केल्याने कार्य अधिक चांगले होते आणि आपण वेगवान प्रगती करतो.
  3. धर्मग्रंथात धर्मादाय दान करण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे, तसेच पृथ्वीवर प्रत्येकासाठी एक सिद्धांत आहे की तो जे देतो तेच त्याला परत मिळेल. म्हणूनच गोड शब्द, मदत, कोमलता, मैत्री, दान, पुण्य इत्यादी गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत जेणेकरुन तुमचे आयुष्य चांगले होईल. दान करणार्‍यांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. दुसरीकडे, श्रीमंत व्यक्ती जो श्रीमंत असूनही समाज कल्याण कार्यात भाग घेत नाही, देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते आणि त्याची संपत्ती एक दिवस नक्कीच नाश पावते.
  4. या व्यतिरिक्त, आचार्य चाणक्य म्हणतात की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा नसते. विनाकारण झोप देखील आरोग्यास हानिकारक आहे.
  5. व्यसन व्यक्तीला तिन्ही प्रकारे म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या नष्ट करते. व्यसनाधीन व्यक्ती कधीही खूप मेहनत करू शकत नाही किंवा तो आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकत नाही. व्यसन अगदी सक्षम व्यक्तीला अपात्र बनवते. म्हणून जर तुम्हाला मा लक्ष्मीचे आशीर्वाद हवे असतील तर हे व्यसन सोडा.

संबंधीत बातम्या :

20 April 2022 | 20 एप्रिल 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

अंगारकी चतुर्थी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळ्यात मांदियाळी

Vastu | चुकूनही दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, वाईट काळ सुरु झालाच म्हणून समजा