Vastu Tips : वास्तूनुसार घरातील ‘या’ ठिकाणी बूट घालू नका, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Dec 17, 2021 | 12:06 PM

वास्तुदोषाचा तुमच्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्राचे योग्य पालन केले तर तुम्हाला मान-सन्मान आणि पैसा मिळतो. त्याशिवाय तुमच्या घरात तुमचे नातेसंबंध देखील चांगले राहण्यास मदत होते.

Vastu Tips : वास्तूनुसार घरातील या ठिकाणी बूट घालू नका, वाचा याबद्दल अधिक!
वास्तूदोष
Follow us on

मुंबई : वास्तुदोषाचा (Vastu Tips) तुमच्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्राचे योग्य पालन केले तर तुम्हाला मान-सन्मान आणि पैसा मिळतो. त्याशिवाय तुमच्या घरात तुमचे नातेसंबंध देखील चांगले राहण्यास मदत होते. यामुळेच बरेच लोक वास्तुशास्त्राचे नियम पाळतात. चला जाणून घेऊया वास्तूनुसार कोणत्या ठिकाणी घरामध्ये शूज ठेवू नयेत.

-ज्या वस्तू आपल्या दररोजच्या वापरामध्ये नसतात. त्या आपण स्टोर रूममध्ये ठेवतो. तसेच आपण स्टोर रूममध्ये ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ यासारख्या गोष्टी देखील ठेवतो. म्हणून हे एक अतिशय शुभ स्थान आहे आणि असे मानले जाते की या ठिकाणी चप्पल किंवा सूज परिधान करून जाऊ नये.

-घरामध्ये असलेल्या मंदिराजवळ चप्पल किंवा शूज घालून फिरू नका. हे अशुभ मानले जाते. आपण मंदिरामध्ये गेल्यावर चप्पल बाहेर सोडतो ना…मग घरामध्ये असलेल्या मंदिराजवळ चप्पल आणि शूज घालून कसे फिरू शकता.

-ज्या ठिकाणी पैसा ठेवला जातो. त्याला तिजोरी म्हणतात. हे स्थान अतिशय शुभ मानले जाते. लोक या स्थानाला धनाची देवी लक्ष्मीचे वरदान मानतात आणि याच कारणामुळे वास्तुशास्त्राने तिजोरीभोवती बूट न ​​घालण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्यास ते अशुभ मानले जाते.

-आरोग्याच्या समस्या आणि वास्तुदोष टाळण्यासाठी शूज आणि चप्पल स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात. जर तुम्ही स्वयंपाकघरात शूज घातले तर ते तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. तसेच बाहेरील धूळ आणि माती चप्पलला लागलेली असते. यामुळे कधीही शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात घालू नका.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधित बातम्या : 

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र