Chanakya Niti | कुठेही घर बांधण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासून घ्या, आचार्य चाणक्य काय सांगतात

| Updated on: Sep 25, 2021 | 7:48 AM

प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवायचे असते. प्रत्येकाला चांगले आणि आरामदायक जीवन हवे आहे. पण हे सर्व फक्त विचार करुन होऊ शकत नाही. यासाठी योग्य दिशेने पावले उचलणे देखील खूप महत्वाचे आहे. यशासाठी योग्य दिशेने जितकी मेहनत आवश्यक आहे तितकीच महत्वाची आहे ती जागा जिथे तुम्ही राहता.

Chanakya Niti | कुठेही घर बांधण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासून घ्या, आचार्य चाणक्य काय सांगतात
chanakya Niti
Follow us on

मुंबई : प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवायचे असते. प्रत्येकाला चांगले आणि आरामदायक जीवन हवे आहे. पण हे सर्व फक्त विचार करुन होऊ शकत नाही. यासाठी योग्य दिशेने पावले उचलणे देखील खूप महत्वाचे आहे. यशासाठी योग्य दिशेने जितकी मेहनत आवश्यक आहे तितकीच महत्वाची आहे ती जागा जिथे तुम्ही राहता.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर त्याचे घर बांधण्यासाठी जागा ठरवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, यशाबरोबरच भविष्यातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्या 5 गोष्टींबद्दल जाणून घ्या जे चाचणी करण्यासाठी आचार्यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य काय म्हणतात?

यस्मिन देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बांधव:,
न च विद्यागमोऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत्.

या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथे आदर नाही, रोजगार नाही, मित्र किंवा नातेवाईक नाहीत, शिक्षण नाही आणि लोकांमध्ये चांगले गुण नाहीत, अशा ठिकाणी कधीही घर बांधू नये. ती जागा सोडणेच चांगले.

या पाच मापदंडांवर जागेची चाचणी करा

1. ज्या ठिकाणी तुमचा आदर नाही अशा ठिकाणी तुम्ही कधीही राहू नये, कारण आजूबाजूचे लोक देखील हे पाहिल्यानंतरच तसेच वागतात. जर तुम्हाला तुमचा आदर होताना दिसत नसेल तर ते तुमचा आदरही करणार नाहीत. अशा ठिकाणी राहणे निरर्थक आहे.

2. आचार्य यांचा असा विश्वास होता की जर प्रगती करायची असेल तर उत्तम रोजगारही हवा असेल. म्हणून, राहण्याचे ठिकाण अशा ठिकाणी असावे जेथे तुमच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. रोजगाराच्या संधी नसल्यास, जागा कितीही सुंदर असली तरी ती तुमच्यासाठी निरुपयोगी आहे.

3. आयुष्यात एक वेळ नक्कीच येते जेव्हा तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईक हवेत. म्हणून, आपले मित्र आणि नातेवाईक जेथे राहतात तेथे घर बांधा. अन्यथा कठीण काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल.

4. शिक्षणाची एक चांगली व्यवस्था असणे फार महत्वाचे आहे. कारण, व्यक्तिमत्त्व फक्त शिक्षणानेच तयार होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून राहण्यासाठी एक जागा निवडा जिथे तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य आहे.

5. ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, ती जागा तुमच्या राहण्यासाठी चांगली आहे. म्हणून जास्तीत जास्त शिकण्याची संधी असलेले ठिकाण निवडा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

पत्नीवर संशय किंवा आर्थिक फटका, कधीही बोभाटा करु नये या 4 गोष्टींचा

Chanakya Niti : वाईट काळात या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या सुटेल