Chanakya Niti : ‘या’ चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण

| Updated on: May 30, 2021 | 7:40 AM

मुंबई : कधी कधी परिस्थिती अशी असते की त्यातून मार्ग काढणं हाच पर्याय असतो. आचार्य चाणक्यनेही अशा चार स्थितींचा उल्लेख ग्रंथ ‘चाणक्यनिती‘मध्ये केलेला आहे. (Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti). सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की, परिस्थिती, वेळ कशीही असो तुम्ही तिचा सामना करा. पण कधी कधी […]

Chanakya Niti : या चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : कधी कधी परिस्थिती अशी असते की त्यातून मार्ग काढणं हाच पर्याय असतो. आचार्य चाणक्यनेही अशा चार स्थितींचा उल्लेख ग्रंथ ‘चाणक्यनिती‘मध्ये केलेला आहे. (Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti).

सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की, परिस्थिती, वेळ कशीही असो तुम्ही तिचा सामना करा. पण कधी कधी वेळ अशी असते की त्यात आपण फसलोत तर त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं. आपण त्या परिस्थितीशी लढायचं ठरवलं तर काही वेळेस ते आपल्या जीवावर बेतू शकतं आणि मान-सन्मानही संकटात येऊ शकतो. पण सर्वच संकटांचा सामना केला पाहिजे का? आचार्य चाणक्य म्हणतात, नाही, अशा चार परिस्थिती, संकटं आहेत, ज्यातून पळ काढण्यातच शहाणपण आहे. त्या चार परिस्थिती कुठल्या?

उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे असाधुजनसंपर्के यः पलायति स जीवति

1.ह्या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य म्हणतात की, जर कुठे हिंसा उसळली असेल आणि जमाव हल्ला करत असेल तर तिथून पळ काढण्यातच शहाणपण आहे. कारण जमावाला तुम्ही नियंत्रीत करु शकत नाही आणि त्या टोळक्याला हिंसेशिवाय काही दिसत नसतं.

2. जर अचानक तुमच्या शत्रूनं हल्ला केला तर तिथून सुरक्षित निघून जाणच गरजेचं आहे. कारण तुमची कितीही इच्छा असली तरीसुद्धा विना तयारी तुम्ही त्याचा सामना करु शकत नाही. अशा अचानक आलेल्या संकटात तुम्ही बहादुरी दाखवायला गेलात तर जीवानीशी जाऊ शकता. यापेक्षा यातून पळ काढलेला बरा.

3. ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला असतो, जिथं लोक अन्नाच्या कणाकणाला तरसत असतील असं ठिकाण सोडणच कधीही चांगलं. कारण अशा दुष्काळी जागी तुम्ही फार काळ जीवंत राहू शकत नाही.

4. जर असा एखादी व्यक्ती जो गुन्हेगार असेल, अपराधी असेल आणि तो तुमच्या जवळ येऊन उभा राहिला असेल तर तिथून निघून जाणं कधीही चांगलं. अशा लोकांसोबत उभं राहिल्यानं तुमची प्रतिमा डागाळू शकते. मान-सन्मान धोक्यात येऊ शकतो.

(Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti).

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

Garuda Purana : या तीन गोष्टी नेहमी मूळापासून नष्ट करायला हव्या, अन्यथा तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो