Chanakya Niti | अशा परिस्थितीमध्ये पत्नी आणि भावंडांसह या लोकांचा त्याग केलेलाच बरा

| Updated on: Jul 08, 2021 | 7:40 AM

आचार्य यांच्या अनुभवांचे अनुसरण करून कोणतीही व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करू शकते आणि सर्वात मोठ्या आव्हानांना सहजपणे सामोरे जाऊ शकते. आचार्य यांनी पत्नी, भावंड, गुरू आणि धर्म यांना फार महत्वाचे मानले आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत त्यांचा त्याग करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य नीति काय म्हणते ते जाणून घ्या.

Chanakya Niti | अशा परिस्थितीमध्ये पत्नी आणि भावंडांसह या लोकांचा त्याग केलेलाच बरा
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य हे एक महान गुरु मानले जातात. ज्यावेळी अख्खा भारत विभागला गेला त्या वेळी त्यांनी एकाच धाग्यात बांधून अखंड भारताचा निर्माण केला होता. त्यांच्या बुद्धिमत्तेनेच एका सामान्य मुलाला सम्राट बनविले. आचार्य यांनी आपले अनुभव आपल्या चाणक्य नीति या ग्रंथातत लिहिले आहेत आणि मनुष्याला धर्माच्या मार्गावर जगण्याचा मार्ग दाखविला आहे (Acharya Chanakya Said You Should Abandoned Your Wife Siblings And Others In These Circumstances In Chanakya Niti).

आचार्य यांच्या अनुभवांचे अनुसरण करून कोणतीही व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करू शकते आणि सर्वात मोठ्या आव्हानांना सहजपणे सामोरे जाऊ शकते. आचार्य यांनी पत्नी, भावंड, गुरू आणि धर्म यांना फार महत्वाचे मानले आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत त्यांचा त्याग करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य नीति काय म्हणते ते जाणून घ्या.

त्यजेद्धर्मं दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्,
त्यजेत्क्रोधमुखं भार्यां नि:स्नेहान् बान्धवांस्त्यजेत् ||

1. जो धर्म एखाद्या व्यक्तीला अहिंसेचा मार्ग दाखवितो, ज्यामध्ये दयेचा उपदेश नाही, त्या धर्माचा त्याग करणे योग्य आहे. असा धर्म माणसाला मानवतेच्या वाटेपासून दूर करतो आणि आपले आयुष्य विनाशच्या मार्गाकडे नेतो. दया न करता कोणताही धर्म माणसाला योग्य मार्ग दाखवू शकत नाही.

2. गुरुंना पालकांइतकेच उच्च स्थान दिले जाते, कारण गुरु शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि नेहमीच त्याच्या हिताबद्दल विचार करतात. परंतु जर गुरु अज्ञानी असेल किंवा शिष्याला योग्य शिक्षण देत नसेल तर अशा गुरूचा त्याग करावा.

3. पती-पत्नीमधील नातेसंबंध म्हणजे सुख आणि दु:ख एकत्र असणे. ज्या घरात नवरा-बायको प्रेमाने राहतात, ते घर स्वर्गासारखे आहे. परंतु जिथे पत्नी रागावली असेल आणि नवऱ्याला साथ देत नसेल तेथे त्या व्यक्तीचे आयुष्य नरकासारखे होते. अशा परिस्थितीत पत्नीचा त्याग करणे चांगले आहे कारण अशा पत्नीबरोबर जगणे शक्य नाही.

4. भाऊ आणि बहिणी कठीण परिस्थितीत एकमेव खरे आधार असतात. परंतु जर आपल्या भावडांना तुमच्याबद्दल प्रेम नसेल किंवा अडचणीच्या वेळी ते सोबत उभे राहिले नाही तर त्यांना सोडणे चांगले.

Acharya Chanakya Said You Should Abandoned Your Wife Siblings And Others In These Circumstances In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या चार गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा आयुष्यात एकटे पडाल

Chanakya Niti | नोकरी आणि व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर या चार गोष्टी लक्षात ठेवा