देवाला अक्षता अर्पण केल्याने सुखाची प्राप्ती, जाणून घ्या आधिक माहिती

| Updated on: Jan 14, 2022 | 2:42 PM

सर्वात सोपा उपाय म्हणजे तांदूळ (Rice)म्हणजेच अक्षता याला धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. सनातन धर्मात अक्षताशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही.

देवाला अक्षता अर्पण केल्याने सुखाची प्राप्ती, जाणून घ्या आधिक माहिती
Rice
Follow us on

मुंबई : आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो पण तरीही आपल्याला यश मिळत नाही. आपल्या पैकी अनेकांना असा अनुभव आला असेल. हिंदू धर्मात (Hindu)असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते . त्यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे तांदूळ (Rice)म्हणजेच अक्षता याला धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. सनातन धर्मात अक्षताशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही.

पण काही देवांच्या पुजेत काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. जस की भगवान शंकराच्या पूजेत त्यांना हळद अर्पण केली जात नाही. तसेच गणपतीला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. दुर्गा देवीला दुर्वा अर्पण केली जात नाही. परंतु विष्णूला अक्षता अर्पण केले जात नाही. चला तर मग जाणून घेऊयात अक्षता अर्पण करताना कोणती काळजी घ्याल.

चला जाणून घेऊया तांदळाचे काही फायदे ज्यामुळे पैशांचा पाऊस पडेल
१- अक्षता अर्पण करा
धार्मिक शास्त्रानुसार तुटलेला तांदूळ कोणत्याही देवता किंवा पूजेला अर्पण करू नये. वास्तविक अक्षत हे परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुटलेला तांदूळ कधीही देवाला अर्पण करू नये, तो अशुभ मानला जातो.

२- भगवान शिव प्रसन्न होतात
शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होतात असे ग्रंथात विशेष नमूद करण्यात आले आहे. याशिवाय तुटलेला तांदूळही भगवान शंकराला अर्पण करू नये. दररोज भगवान शंकराला अक्षत अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

3-कुमकुम आणि अक्षता एकत्र करा 
अन्नामध्ये तांदूळ हे नेहमीच सर्वोत्तम मानले जातात, म्हणूनच सर्व देवी-देवतांना तांदूळ अर्पण केला जातो. यासोबतच कुंकुम लावल्याशिवाय सनातन धर्मात कोणतीही गोष्ट यशस्वी मानली जात नाही. देवाला कुमकुमसह अक्षत अर्पण करणे देखील पुण्यपूर्ण मानले जाते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या

Bell in temple | मंदिरात घंटा का असते, जाणून घ्या त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व

shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

Makar Sankranti 2022 | कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी, संक्रांतीच्या निमित्त श्री. विठ्ठल मंदिरात फुलं फळे भाजी व पतंगाची आरास