बेडरूममध्ये या देवतांचे फोटो कधीही लावू नका; होईल वाद अन् कटकट
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रत्येक कोपऱ्याला एक वेगळं महत्त्व असतं. कारण त्याची ऊर्जाही वेगळी असते. वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये काही देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. जाणून घेऊयात की बेडरुममध्ये कोणत्या देवी-देवतांचे फोटो लावणे शुभ असते आणि कोणत्या अशुभ.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रत्येक कोपऱ्याची एक वेगळी ऊर्जा असते आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर, नातेसंबंधांवर खोलवर परिणाम होत असतो. विशेषतः घरातील सर्वात खाजगी आणि आरामदायी जागा मानल्या जाणाऱ्या बेडरूमसाठी देखील वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोक अनेकदा प्रत्येक खोलीत देवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवतात, परंतु वास्तुनुसार, हे नेहमीच शुभ मानले जात नाही.
बेडरुममध्ये कधीही देवतांचे फोटो लावणे शुभ मानले जात नाही
बेडरुममध्ये कधीही देवतांचे फोटो लावणे शुभ मानले जात नाही. कारण देवाचे फोटो हे नेहमी देवघरातच असावेत. त्यांच्यासाठी तेच पवित्र स्थान मानले जाते. म्हणून बेडरूममध्ये देवाचे चित्र ठेवण्यापूर्वी खूप काळजी घेतली पाहिजे. कारण ही जागा विश्रांती, प्रेम आणि वैयक्तिक नातेसंबंधांशी संबंधित असते.
वास्तुनुसार, देवतांचे फोटो बेडरूममध्ये लावू नयेत
वास्तुशास्त्रात बेडरूमला एक शांत आणि आरामदायी जागा मानले जाते. जिथे सकारात्मक आणि संतुलित उर्जेचा प्रवाह आवश्यक असतो. म्हणून, येथे देवतांचे फोटो लावल्याने उर्जेवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी, यामुळे पती-पत्नीमध्ये मतभेद, कलह किंवा तणाव देखील निर्माण होऊ शकतो. म्हणून, वास्तुनुसार, देवतांचे फोटो बेडरूममध्ये लावू नयेत. तथापि, जर तुम्हाला धार्मिक पावित्र्य आणि सकारात्मकता राखण्यासाठी देवतांचे फोटो लावायचे असतील तर काही विशिष्ट फोटो यासाठी योग्य मानली जातात.
बेडरूममध्ये या देवी-देवतांचे फोटो लावणे शुभ मानले जाते.
बेडरूममध्ये राधा-कृष्ण किंवा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे चित्र ठेवणे शुभ मानले जाते. राधा-कृष्ण म्हणजे प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. त्यांचे फोटो लावल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद टिकतो आणि नात्यात गोडवा येतो. तसेच भगवान शिव आणि पार्वती यांचे चित्र घरात शांती, स्थिरता आणि परस्पर सहकार्याचे वातावरण निर्माण करते. तथापि, लक्षात ठेवा की राधा किंवा कृष्णाचे चित्र कधीही एकटे ठेवू नये; त्यांना नेहमी जोडीच्या स्वरुपातच लावावे. एकटे फोटो लावल्याने कारण यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर किंवा अस्थिरता येऊ शकते.
बेडरूममध्ये या देवी-देवतांचे फोटो लावू नये
तसेच बेडरूममध्ये कोणत्या देवतांच्या प्रतिमा ठेवू नयेत हे देखील स्पष्ट केले आहे. उदाहरणार्थ, भगवान हनुमान, देवी दुर्गा किंवा कोणत्याही देवतेच्या प्रतिमा ध्यानस्थ स्थितीत ठेवणे टाळावे. अशा प्रतिमा ऊर्जा जास्त सक्रिय करू शकतात, ज्यामुळे बेडरूमचे शांत स्वरूप बिघडू शकते. यामुळे अनावधानाने तणाव, मतभेद आणि कधीकधी आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात.
याव्यतिरिक्त मंदिर म्हणजे देव्हारा कधीही बेडरूममध्ये ठेवू नका. घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेने मंदिर ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते. तथापि, जर तुम्हाला बेडरूममध्ये धार्मिक प्रतीक ठेवायचे असेल तर ते खोलीच्या उत्तर भिंतीजवळ ठेवा आणि झोपताना तुमचे डोके दक्षिणेकडे ठेवा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
