Navratri 2026: कन्या पूजन करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका; लक्षात ठेवा या गोष्टी

Kanya Pujan: नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला कन्या पूजनाला विशेष महत्त्व असते. या दिवशी लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. मात्र, कन्या पूजन करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Navratri 2026: कन्या पूजन करताना चुकूनही करू नका या चुका; लक्षात ठेवा या गोष्टी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Oct 17, 2026 | 5:42 PM

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व असून, अनेक घरांमध्ये या दिवशी कन्या पूजन केले जाते. लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते, त्यांना शिरा, पुरी आणि काळे हरभरे असा प्रसाद दिला जातो. मात्र, कन्या पूजन करताना काही धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, हे जाणून घ्या.

मुलींचे वय आणि संख्या याकडे लक्ष द्या
धार्मिक मान्यतेनुसार, कन्या पूजनासाठी २ ते १० वर्षे वयोगटातील मुलींना घरी बोलावणे शुभ मानले जाते. पूजेसाठी शक्य असल्यास नऊ मुली आणि एका लहान मुलाला बोलावण्याची परंपरा आहे. त्यामुळे कन्या पूजन करताना मुलींचे वय आणि संख्या याकडे विशेष लक्ष द्यावे.
हात-पाय धुतल्याशिवाय भोजन देऊ नका
कन्या पूजनासाठी आलेल्या मुलींचे सर्वप्रथम हात-पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर टॉवेलने पुसून त्यांना आदराने बसवावे. काही ठिकाणी मुलींच्या पायांना आलता लावणेही शुभ मानले जाते. हात-पाय न धुताच पूजेला आणि भोजनाला सुरुवात करणे टाळावे.
जेवणात लसूण, कांद्याचा वापर करू नका
कन्या पूजनाच्या वेळी मुलींना प्रसाद म्हणून काळे हरभरे, शिरा आणि पुरी देण्याची परंपरा आहे. हे भोजन सात्त्विक पद्धतीने तयार करावे. त्यात लसूण आणि कांद्याचा वापर करू नये. तसेच भोजन ताजे असावे आणि ते शुद्ध तुपात तयार करण्याची काळजी घ्यावी.
कन्यांना निरोप देताना या चुका टाळा
कन्या पूजन पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपल्या श्रद्धेनुसार भेटवस्तू किंवा फळे द्यावीत. त्यांना आदराने आणि आनंदाने निरोप द्यावा. पूजेदरम्यान एखाद्या मुलाकडून चूक झाल्यास त्याच्यावर रागावू नये किंवा त्याला काही बोलू नये. मुलांशी प्रेमाने वागून आनंदी वातावरणात पूजा पूर्ण करावी.
घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा
ज्या घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण असते, तिथे देवी दुर्गेचा वास असतो, असे मानले जाते. त्यामुळे कन्या पूजनाच्या दिवशी घरात विनाकारण वाद घालणे, भांडणे किंवा कटू बोलणे टाळावे. घर स्वच्छ ठेवावे आणि पूजेदरम्यान मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नयेत.

Loading...

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us