AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badrinath Landslide: बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, भोपाळचे 32 भाविक अडकले

बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शहरातील सर्व 32 प्रवासी सुखरूप आहेत. वाट मोकळी होण्याची वाट पाहत आहे.

Badrinath Landslide: बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, भोपाळचे 32 भाविक अडकले
बद्रीनाथ हायवेवर दरड कोसळली
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 28, 2022 | 4:51 PM
Share

श्रावण महिन्याच्या पार्शवभूमीवर अनेक लोक चार धाम यात्रेला (Char dham yatra) गेले आहेत. बुधवार-गुरुवारी मध्यरात्री बद्रीनाथ (Badrinath) महामार्गावरील पीपळ कोठीजवळ पागल नाल्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे (Badrinath Highway Landslide). मार्गावर डोंगराचा ढिगारा पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत. यात भोपाळचे 32 यात्रेकरूही अडकले आहेत. भारत नगर अरेरा कॉलनीतील रहिवासी दिनेश सिंह कुशवाह यांनी सांगितले की, ते 18 जुलै रोजी चारधाम यात्रेसाठी भोपाळहून निघाले होते. 10 दिवस गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ चार धाम प्रवास केल्यानंतर भोपाळचे 32 प्रवासी दोन मिनी बसमधून हरिद्वारला जात होते, त्या रात्री वाटेत दरड कोसळली.

भोपाळशिवाय राज्यातील विविध शहरांतील लोक अडकून पडले आहेत. मार्ग खुला करण्यासाठी तीन पाकलँड आणि दोन जेसीबी कार्यरत आहेत. रस्ता मोकळा होण्यासाठी काही तास लागू शकतात. त्यानंतरच यात्रेकरूंना हरिद्वारला जाता येणार आहे.

प्रवासी सुरक्षित, मार्ग मोकळा होण्याची पाहत आहेत वाट

बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शहरातील सर्व 32 प्रवासी सुखरूप आहेत. वाट मोकळी होण्याची वाट पाहत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार जात असताना अचानक डोंगरावरून दगड पडल्याचा मोठा आवाज आला. डोंगरावरून माती पडून रस्त्यावर आली. त्यावेळी भीतीदायक घटना घडली, मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

हरिद्वारला भेट देऊन प्रवासी परततील

शहरातील सर्व 32 प्रवासी हरिद्वारला दर्शन घेतल्यानंतर भोपाळला परततील. त्यांच्या सहलीला 10 दिवस झाले आहेत. या दुर्घटनेमुळे प्रवाशांना जास्त वेळ लागेल. रस्ता उघडल्यानंतर ते बद्रीनाथ महामार्गाने हरिद्वारला पोहोचतील. हरिद्वारला भेट दिल्यानंतर मिनी बसने भोपाळला परत येतील. ते सुखरूप असल्याची माहिती प्रवाशांनी कुटुंबीयांना दिली आहे.

Follow Us
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल