AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FlyDubai: स्मिथ माछरवर हल्ला करण्याऱ्या ओमानी पायलटबद्दल खळबळजनक खुलासा, तपासात आलं धक्कादायक सत्य समोर

FlyDubai Omani Pilot Name: फ्लायदुबई फ्लाईट प्रकरणाथ आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या ओमानी पायलट ने भारतीय वैमानिकावर हल्ला केला होता त्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

FlyDubai: स्मिथ माछरवर हल्ला करण्याऱ्या ओमानी पायलटबद्दल खळबळजनक खुलासा, तपासात आलं धक्कादायक सत्य समोर
| Updated on: Oct 03, 2026 | 10:14 AM
Share

FlyDubai Flight: फ्लाय दुबईचे भारतीय पायलट स्मित मच्छर यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-पायलटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या सह-पायलटचे नाव हमाम अल-हमामी असून, एअर ओमानने त्याच्यावर बंदी घातली होती. हमामीची विचारसरणी सुरुवातीपासूनच कट्टर होती. तो केवळ आठ महिन्यांपूर्वीच फ्लाय दुबईमध्ये सामील झाला होता. हमामीच्या अटकेनंतर, त्याच्या बॅगेतून ‘फ्री पॅलेस्टाईन’चा प्रचार करणाऱ्या पत्रकांसह विविध वस्तू जप्त करण्यात आल्या.

सूत्रांनुसार, ओमानचा पायलट हमामीने वारंवार आपली कट्टर विचारसरणी व्यक्त केली होती. तो इस्रायलला शत्रू मानत असे आणि पॅलेस्टाईनबद्दल तीव्र सहानुभूती व्यक्त करत असे. आता या तपासाला एक नवीन वळण लागले आहे. गुप्तचर यंत्रणा त्याच्या दहशतवादी हेतूंची चौकशी करत आहेत. त्याला विमान का पाडायचे होते, हे निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

इस्रायली अधिकारी फ्लाय दुबईच्या विमानातील ओमानच्या सह-पायलटची चौकशी करतील. या तपासात कोणत्या यंत्रणा किंवा अधिकारी सहभागी होतील हे सूत्रांनी स्पष्ट केले नसले तरी, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अधिकारीही यात सहभागी असतील.

फ्लायदुबई फ्लाईट FZ 1073 वरील भीषण घटनेसंदर्भात अनेक खुलासे समोर आले आहेत आणि आता फ्लायदुबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी गैथ अल गैथ यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. गैथ म्हणाले, “मी आमचे कॅप्टन, विमान सुरक्षितपणे उतरवणारे पायलट आणि केबिन क्रू यांनी दाखवलेल्या व्यावसायिकतेची आणि समर्पणाची प्रशंसा करू इच्छितो. या आव्हानात्मक परिस्थितीत आमच्या क्रूला मदत करणाऱ्या विमानातील प्रवाशांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.”

ते पुढे म्हणाले, “फ्लायदुबईच्या वतीने, मी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या तत्पर आणि व्यावसायिक प्रतिसादाबद्दल आभार मानू इच्छितो. तसेच, आमचे ग्राहक आणि क्रू यांना मायदेशी परत आणण्यासाठी मदत केल्याबद्दल मी यूएई अधिकारी आणि संबंधित हितधारकांचेही आभार मानतो.” आता तपास सुरु असल्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येतील, अनेक धक्कादायक गोष्टीं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक