AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर तासाला फक्त 5 मिनिटं चाला अन् पाहा आरोग्यास होणारे फायदे, आजच करा सुरुवात

डॉक्टर कायम एकच सल्ला देतात आणि तो म्हणजे दिवसाला किमान अर्धा तास शारीरिक हलचाल झालीच पाहिजे... अशात दर तासाला फक्त 5 मिनिटं चालल्याने देखील आरोग्यास अनेक फायदे होतात. तर ते कोणते फायदे आहेत जाणून घ्या...

दर तासाला फक्त 5 मिनिटं चाला अन् पाहा आरोग्यास होणारे फायदे, आजच करा सुरुवात
| Updated on: Oct 03, 2026 | 10:04 AM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस पूर्णपणे व्यस्त झाला आहे. एवढंच नाही रोजच्या प्रवासामुळे शरीरात त्राण राहत नाही. आजच्या दिवसांबद्दल सांगायचं झालं तर, अनेक लोक नोकरी किंवा कामांमुळे दिवसभर डेस्कवर, कार्यालयात किंवा घरी तासन्तास बसून राहतात. सतत बसण्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. केंब्रिज आणि कोलंबिया विद्यापीठांतील संशोधकांनी यावर एक सोपा उपाय सुचवला आहे. तो म्हणजे, दर तासाला किमान 5 मिनिटे चाला. डॉक्टर देखील कायम चालण्याचा सल्ला देतात.

चालल्यामुळे रक्ताभिसरण आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने पायांमधील रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण मंदावते. दर तासाला 5 मिनिटं उठून चालल्याने हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.

रक्तातील साखरेच्या पातळीच नियंत्रण प्रमाणात राहतं. जेवणानंतर किंवा बैठे काम करताना रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. दर तासाला 5 मिनिटं चालल्याने स्नायूंना ग्लुकोज अधिक वेगाने शोषून घेण्यास मदत होते. परिणामी, टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.

पाठदुखी आणि स्नायूंचा ताण कमी करते. एकाच जागी बसल्याने पाठीचा कणा, मान आणि कमरेच्या स्नायूंवर खूप दाब येतो. थोडा वेळ थांबून चालल्याने स्नायू शिथिल होतात आणि शरीर योग्य स्थितीत येते. यामुळे दीर्घकालीन पाठदुखी टाळण्यास मदत होऊ शकते.

मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते. सतत स्क्रीनसमोर बसल्याने मेंदू थकतो. दर तासाला 5 मिनिटं चालल्याने मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि एंडोर्फिन नावाचं आनंदी हार्मोन्स स्रवतात. यामुळे तणाव कमी होतो आणि तुमच्या कामातील एकाग्रता व उत्साह वाढतो.

निरोगी राहण्यासाठी तुम्हाला व्यायामशाळेत तासन् तास घालवण्याची गरज नाही. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत दर तासाला 5 मिनिटं चालण्याची सवय लावा. हा छोटासा बदल तुमचे आयुष्यभराचे आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढवण्यासाठी एक उत्तम साधन ठरू शकतो. पण जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक