AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवघराच्या मार्बलवर चढलायं का काळपटपणा? या सोप्या टिप्सने होईल चकाचक

रोज उदबत्ती पेटवल्याने संगमरवरी देवघर काळे आणि चिकट होते. संगमरवरी देवघर साफ (Mandir Cleaning tips) करणे हे सर्वात कठीण काम आहे. आपले घर आणि देवघर नेहमीच चमकावे असे प्रत्येकाला वाटते. काही सोप्या आणि घरगुती टिप्स वापरून तुम्ही देवघर स्वच्छ करू शकता.

देवघराच्या मार्बलवर चढलायं का काळपटपणा? या सोप्या टिप्सने होईल चकाचक
देवघरImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 15, 2023 | 8:07 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक घरात देवघर असते. मग ते लाकडी असो वा संगमरवरी. लोकं दररोज घरात धुप आणि अगरबत्ती लावतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच घरात सुख-शांती सुद्धा नांदते पण रोज उदबत्ती पेटवल्याने संगमरवरी देवघर काळे आणि चिकट होते. संगमरवरी देवघर साफ (Mandir Cleaning tips) करणे हे सर्वात कठीण काम आहे. आपले घर आणि देवघर नेहमीच चमकावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करून बघतात, पण विशेष परिणाम होत नाही. तुम्हालाही देवघर नवीनसारखे चमकवायचे असेल तर काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊया या टिप्स.

कॉर्न फ्लोअर करेल तेलाचा चिकटपणा दूर

देवघरात पूजा कराताना दिवा नक्कीच लावला जातो. त्यामुळे देवघरावर तेलाच्या खुणा राहतात. विशेषतः संगमरवरी देवघरावर त्या दिसूनच येतात. जेव्हा असे होते, तेव्हा अनेक प्रयत्न करूनही ते पुर्णपणे निघत नाही. यापासून सुटका हवी असेल तर चिकट जागी थोडे कॉर्नफ्लोअर ठेवा. सुमारे 5-7 मिनिटांनंतर, ते कापडाने स्वच्छ करा. असे केल्याने  तेलाचे डाग आणि काळपटपणा सहज दूर होतील.

लोखंडी वायर ब्रश वापरा

संगमरवरी मंदिर स्वच्छ करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की संगमरवरी मंदिराच्या स्वच्छतेसाठी लोखंडी वायर ब्रशचा वापर करावा. त्यात व्हिनेगर, लिंबू आणि बेकिंग सोडा वापरता आला तर संगमरवरी दगड सहज सापडतो.

बेकिंग सोडा देखील प्रभावी आहे

तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून देवघरावरील किंवा फरशीवरील हट्टी डाग काढू शकता. यासाठी बेकिंग सोडामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट डागावर लावा आणि ती सुकल्यानंतर स्वच्छ कापडाने घासून घ्या. यामुळे हट्टी रंगाचे डाग लगेच दूर होतील.

तुथपेस्ट करेल काळपटपणा दूर

कोलगेटसारखी तुथपेस्ट काळपट डाग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. देवघर आधा  ओल्या कापडाने पुसून घ्या त्यानंतर त्यावर तुखपेस्ट चोळून लावा. 10 मिनीटांनी ती ओल्या कापडाने पुसून घ्या.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?